ब्रिजटाऊन : धर्मशाला येथे वन-डे सामना खेळल्यानंतर भारताचा दौरा तडकाफडकी सोडल्याबद्दल भारतीय क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर 250 कोटींचा नुकसानभरपाई दावा दाखल केला आहे. बोर्डासोबत वेतन मुद्दय़ावर सुरू असलेल्या तंटय़ामुळे विंडीज खेळाडूंनी न खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे आधीच कंगाल झालेल्या विंडीज बोर्डाला बीसीसीआयने हा आणखी एक धक्का दिल्याने संकट कोसळू शकते.
बीसीसीआय सचिव संजय पटेल म्हणाले, की मी 25क् कोटी नुकसानभरपाई करण्याची मागणी असलेले पत्र विंडीज बोर्डाकडे पाठविले आहे. आम्ही दौरा सुरू ठेवण्यासाठी वारंवार आग्रह धरला; शिवाय मध्यस्थीची तयारीही दाखविली. तरीही दौ:यातून माघार घेतल्याने भारतीय क्रिकेटच्या नुकसानभरपाईचा दावा करणारे पत्र पाठवावे लागले.
पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेपाठोपाठ विंडीजला भारताविरुद्ध एक टी-2क् सामना आणि हैदराबाद, बंगळुरू तसेच अहमदाबाद येथे कसोटी सामने खेळायचे होते.
बीसीसीआयने विंडीज बोर्डाला नुकसानभरपाई कशी करणार, याची ठोस योजना सादर करण्यासाठी दोन आठवडय़ांचा अवधी दिल्याचे विश्वसनीय सूत्रंनी सांगितले. असे न झाल्यास कॅरेबियन बोर्डाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल.
पटेल यांच्या स्वाक्षरीनिशी असलेल्या या पत्रत पुढे म्हटले आहे, की बीसीसीआयला जो आर्थिक फटका बसला, त्याची नुकसानभरपाई कशी करणार आणि त्यासाठी काय पावले उचलणार, हेदेखील स्पष्ट करावे. पत्र मिळाल्यापासून 15 दिवसांत अटी आणि शर्ती स्वीकारार्ह असल्याचा प्रस्ताव मिळाला नाही, तर बीसीसीआय भारतीय न्यायालयात आपल्या वकिलांमार्फत खटला दाखल करेल. ही पहिली नोटीस औपचारिक मागणी असल्याचे आपण मानू शकता. पटेल यांनी हे पत्र विंडीज क्रिकेट बोर्डाचे प्रमुख डेव्ह कॅमेरून यांना पाठविले आहे.(वृत्तसंस्था)
भारताची मनधरणी करावी : अॅण्डी रॉबर्ट्स
बीसीसीआयने 25क् कोटींचा नुकसानभरपाईचा दावा केल्यामुळे विंडीज बोर्डाचे अस्तित्व धोक्यात येणाची भीती व्यक्त करून हा दावा मागे घेण्यासाठी विंडीज अधिका:यांनी ताबडतोब भारतात दाखल होऊन समजूत काढायला हवी, असे मत विंडीजचे वेगवान गोलंदाज अॅण्डी रॉबर्ट्स यांनी व्यक्त केले.
बीसीसीआयने विंडीजसोबतचे क्रिकेट संबंध तोडलेच; शिवाय मोठय़ा रकमेची मागणी केली. यामुळे विंडीज क्रिकेट संपण्याची भीती आहे. यावर रॉबर्ट्स म्हणाले, ‘‘विंडीज बोर्ड आणि खेळाडूंमध्ये काय चालले आहे, हे पाहण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यापेक्षा विंडीजच्या अधिका:यांनी भारतात दाखल होऊन समजूत काढायला हवी. भारत-विंडीजदरम्यान पुढील आठ वर्षात पाच मालिकांचे आयोजन आहे. त्यात चार वेळा भारतीय संघ विंडीजचा दौरा करेल. भारताने हे दौरे न केल्यास आमच्या देशातील क्रिकेट रसातळाला जाईल.’’ दौरा अर्धवट सोडणा:या खेळाडूंच्या निर्णयाचा मी धिक्कार करतो; पण कुणाला दोषी धरण्याआधी सविस्तर माहिती मिळवावी लागेल, असे रॉबर्ट्स यांचे मत आहे. (वृत्तसंस्था)