लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शारीरिक शिक्षण विषय संपविण्याचा राज्य शासनाचा डाव असल्यामुळेच तब्बल ११ वेळा क्रीडा मंत्र्यांना निवेदन देऊनही क्रीडा शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य शासनाविरुद्ध आता असहकार अस्त्र उगारल्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका राज्यातील शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विषयाच्या शिक्षकांनी घेतली आहे.विशेष शिक्षक म्हणून गणले गेलेले हे शिक्षक शासनाच्या लेखी सध्या कुचकामी ठरले आहेत. तासिका कमी करण्याचा आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा विषय संपविण्याचा घाट घातला जात आहे. अन्यशिक्षकांसारखे त्यांना शाळेत महत्त्व दिले जात नाही. ‘अडीचशे विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक’ असा जीआर असताना अतिरिक्त ठरविण्याचे धोरण सुरू आहे. याबाबत क्रीडामंत्री ऐकायला तयार नाहीत. श्क्षिण आणि क्रीडा सचिव देखील अरेरावीने बोलतात. खुद्द मुख्यमंत्री तोडगा काढण्याविषयी हतबलता दर्शवितात. जिह्याचे पालकमंत्री मिटिंग लावतो, असे सांगून वेळ मारून नेतात. शासनदरबारी हा प्रश्न सुटत नसल्याने न्यायालयाचे दार ठोठावण्याशिवाय पर्याय नसल्याचे शिक्षक संघटनेचे मत आहे.म. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षणशिक्षक संघटनेचे सचिव डॉ. पद्माकर चारमोडे यांनी पत्रकार परिषदेत शिक्षकांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले,‘२०१४ पासून शारीरिक शिक्षण आणि क्रीडा शिक्षकांवर शासनाची वक्रदृष्टी सुरू झाली. या शिक्षकांना अन्य विषय शिकविण्यासाठी बाध्य केले जात आहे. शालेय स्तरावर खेळाडू घडविण्याचे काम आम्हीच करतो. विद्यार्थ्यांना शारीरिक कौशल्य शिकविणे यासाठी एका वर्गाला आठवड्याला चार तासिका असायच्या. त्या कमी करण्यात आल्याने आम्हाला अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. सीबीएसई शाळांमध्ये आठ-आठ क्रीडा शिक्षक ठेवण्यात येत असताना राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये ‘खेळ आणि शारीरिक शिक्षणा’कडे डोळेझाक करण्याचे आडमुठे धोरण राबविले जात आहे. याविरुद्ध राज्यभर प्रत्येक जिल्"ात आंदोलन सुरू करण्यात येईल. शालेय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनात आमच्या शिक्षकांची मोठी भूमिका असते. यंदा या स्पर्धांवर बहिष्कार टाकण्यात येईल. राज्यभर कृती समिती स्थापन झाली असून काळ्याफिती लावून शिक्षक काम करतील. याशिवाय न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.’ औरंगाबाद हायकोर्टात आधीच याचिका दाखल केली आहे. एकट्या नागपूर जिल्"ात २००० शिक्षक असल्याचे चारमोडे यांनी सांगितले. सीबीएसई शिक्षक संघटनेचा देखील या भूमिकेला पाठिंबा असल्याचे सीबीएसई शारीरिक शिक्षण व क्रीडा संघटनेचे प्रमुख डॉ. इंद्रजित बासू यांनी यावेळी जाहीर केले.क्रीडा शिक्षकांच्या मागण्या...शारीरिक शिक्षकांना विशेष शिक्षक संबोधले जावे.तासिकांमध्ये कपात करू नये. आधीसारख्याच एका वर्गासाठी चार तासिका कायम ठेवाव्यात२५० विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षक असावा.सीबीएसई शाळांमधील क्रीडा शिक्षकांसारखे विविध क्रीडा प्रकारांसाठी शिक्षक नेमावेत.शारीरिक शिक्षण आणि क्रीडा या विषयाला अन्य विषयांसारखे महत्त्व देण्यात यावे.क्रीडा शिक्षकाला अन्य विषय शिकविण्याची सक्ती नसावी.तज्ज्ञांची उपस्थितीपत्रकार परिषदेला विविध खेळांमधील तज्ज्ञ शिक्षक डॉ. संजय चौधरी, सुधीर पुसदकर, विशाल लोखंडे, सोनाली पाथ्रडकर, सुदाम राखडे, अश्फाक शेख,महेश डबली, सचिन देशमुख, प्रिया भोरे, डॉ. शिल्पा शेळके, नंदलाल यादव उपस्थित होते.
२५० विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक हवाच, शासन ऐकत नाही, मग आमचेही असहकार आंदोलन
By admin | Published: July 15, 2017 12:46 AM