मुंबई : महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक ३३ खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी क्रीडा विभागाला दिले.याबरोबरच कुस्तीपटू राहुल आवारे यांनाही थेट नियुक्ती देण्यात यावी, असेही मुख्यमंत्री स्पष्ट केले.मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खेळाडूंना क्रीडा विभागात गट अ ते गट ड प्रवर्गात सामावून घेण्यात येणार आहे.शासन सेवेत थेट नियुक्ती मिळविणाऱ्या खेळाडूंची यादी अशी - ललिता बाबर, जयलक्ष्मी सारीकोंडा, भक्ती आंब्रे, अंकिता मयेकर, अमित निंबाळकर, सारीका काळे, सुप्रिया गाढवे, विजय शिंदे, राहुल आवारे, मोनिका आथरे, स्वप्नील तांगडे, आनंद थोरात, सिध्दार्थ कदम, मानसी गावडे, नेहा साप्ते, रोहित हवालदार, युवराज जाधव, बाळासाहेब पोकार्डे, कविता घाणेकर, सचिन चव्हाण, संजीवनी जाधव, देवेंद्र सुनील वाल्मिकी, सायली जाधव.शासन सेवेत थेट नियुक्ती मिळविणारे दिव्यांग खेळाडू असे- सुयश जाधव, लतिका माने, प्रकाश मोहारे, इंदिरा गायकवाड, सुकांत कदम, मार्क धरमाई, रुही शिंगाडे, दिनेश बालगोपाल, ओम लोटलीकर, कांचनमाला पांडे.
३३ खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 1:05 AM