शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

पाकिस्तानच्या तुरुंगांमध्ये ५४६ भारतीय कैदी

By admin | Published: July 02, 2017 12:50 AM

जवळपास ५०० मच्छीमारांसह ५४६ भारतीय नागरिक पाकिस्तानात वेगवेगळ्या तुरुंगांत आहेत. पाकिस्तान सरकारने या नागरिकांची यादी

इस्लामाबाद : जवळपास ५०० मच्छीमारांसह ५४६ भारतीय नागरिक पाकिस्तानात वेगवेगळ्या तुरुंगांत आहेत. पाकिस्तान सरकारने या नागरिकांची यादी भारताचे येथील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांना शनिवारी दिली. दोन देशांत २१ मे २००८ रोजी झालेल्या करारानुसार ही यादी दिली गेली. भारतीय कैद्यांमध्ये ५२ नागरिक आणि ४९४ मच्छीमार आहेत, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. या करारानुसार दोन्ही देशांना प्रत्येक १ जानेवारी आणि १ जुलै रोजी एकमेकांना कैद्यांची यादी द्यावी लागते. भारत सरकारदेखील नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्यायुक्तांकडे कैद्यांची यादी सुपुर्द केली आहे. या वर्षी एक जानेवारी रोजी पाकिस्तानने भारताला दिलेल्या यादीनुसार ३५१ भारतीय कैदी (५४ नागरिक आणि २९७ मच्छीमार) त्यांच्या ताब्यात होते. या वर्षी ६ जानेवारी रोजी २१९ भारतीय मच्छीमारांना सोडण्यात आले तर १० जुलै रोजी ७७ मच्छीमार आणि एका नागरिकाची सुटका केली जाईल.जानेवारी महिन्यात पाकिस्तानने २१८ भारतीय मच्छीमारांची सुटका केली होती. तत्पूर्वी भारताने एवढ्याच पाकिस्तानी नागरिकांची सुटका केल्यानंतर पाकिस्ताननेही तसाच प्रतिसाद दिला होता.भारतात सुमारे  ३00 पाकिस्तानीगुजरातमधील मच्छीमार समुद्रात अनेकदा भारताची सागरी सीमा ओलांडतात, तर कराचीतील मच्छीमार त्यांच्या देशाची सागरी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत येतात. आजच्या घडीला सुमारे ९0 पाकिस्तानी मच्छीमार आणि अन्य अंदाजे २00 पाक नागरिक भारताच्या विविध तुरुंगांत आहेत.