शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

स्वप्नपूर्ती! Paris Olympics मध्ये दिसणार 'आजी'बाई; ५८ वर्षीय खेळाडू मैदानात, प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 3:52 PM

Zhiying Zeng Olympic Debut at 58 : येत्या २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे.

Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये खेळणे म्हणजे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न... येत्या २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. ११ ऑगस्ट २०२४ पर्यंत या बहुचर्चित स्पर्धेचा थरार रंगेल. ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्वच क्षेत्रातील खेळाडू आपल्या जीवाची बाजी लावत असल्याचे दिसतात. खरे तर यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांना आजीबाई दिसणार आहेत. ५८ वर्षीय या महिला खेळाडूचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा आहे. चीली या देशातील असलेल्या झीइंग जेंग (Zhiying Zeng) ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. त्या एक टेबल टेनिस प्लेयर आहेत. (zhiying zeng table tennis) 

वयाच्या ५८ व्या वर्षी झीइंग यांनी त्यांचे स्वप्न साकार करताना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्रता मिळवली आहे. त्यांनी टेबल टेनिसमधून संन्यास घेतला होता. मात्र कोरोनाचा काळ त्यांच्यासाठी एक संधी घेऊन आला. या कालावधीत त्यांनी घरी टेबल टेनिसचा सराव करत या खेळाप्रतीची आवड जिवंत ठेवली. लॉकडाऊन संपताच स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेत सहज विजय मिळवण्यात त्यांना यश आले. २०२३ पर्यंत त्या देशातील आघाडीच्या खेळाडू बनल्या. मग चिलीच्या राष्ट्रीय संघासाठी त्यांनी पात्रता मिळवली. 

'आजी'बाईंची स्वप्नपूर्तीदरम्यान, झीइंग जेंग यांचा जन्म १९६६ मध्ये चीनमध्ये झाला. लहानपणी त्यांना आईने या खेळाचे धडे दिले. ११ व्या वर्षापासून त्या मोठ्या स्पर्धांमध्ये झळकू लागल्या. १९८३ पर्यंत जेंग यांची चीनच्या राष्ट्रीय टेबल टेनिस संघासाठी निवड झाली आणि मग त्यांनी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहिले. पण १९८६ मध्ये सुरू झालेल्या 'टू-कलर रूल'मुळे त्यांच्या खेळाला फटका बसला आणि त्यांनी चीनचा राष्ट्रीय संघ सोडला. १९८९ मध्ये एका चिनी प्रशिक्षकाने त्यांना चिलीमधील शाळकरी मुलांना प्रशिक्षण देण्याची नोकरी दिली. त्यानंतर झीइंग जेंग यांनी चिलीमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि नंतर चिनी वस्तूंच्या आयात व्यवसायात स्वत:ला झोकून दिले. २०२२ मध्ये जेंग यांनी पुन्हा एकदा टेबल टेनिस या खेळाकडे आपला मोर्चा वळवला. जेणेकरून त्यांच्या मुलाला लागलेली व्हिडीओ गेमची सवय सुटावी हा त्यामागील उद्देश होता. तिथूनच त्यांचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास सुरू झाला. 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतालाही चांगल्या पदकांची आशा असेल. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदके जिंकली होती. नीरज चोप्राच्या रूपात भारतात एकमेव सुवर्ण पदक आले. तर दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांनी भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Table Tennisटेबल टेनिसInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीSocial Viralसोशल व्हायरल