मुंबई : फुटबॉल क्षेत्रचे लक्ष लागलेल्या ‘हिरो इंडियनसुपर लीग’ स्पर्धेसाठी स्थानिक खेळाडूंचा लिलावाचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडला. स्पर्धेतील फ्रेन्चायझींनी भारतीय फुटबॉलमधील दिग्गज खेळाडूंच्या खरेदीवर जोर दिला. लिलाव प्रक्रियेच्या सात फे:या मंगळवारी झाल्या. आता दुस:या टप्प्यातील सात फे:या बुधवारी होतील.
लिलावात सहभागी झालेल्या क्लबच्या अधिका:यांनी विचार-विनिमय करून खेळाडूंची निवड केली. देशात फुटबॉलचा प्रचार आणि लोकप्रियता वाढवण्यासाठी ‘आयएसएल’ सुरू करण्यात येत आहे. स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रियेत पहिल्या दिवशी अशा खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले, जे गेलय़ा तीन-चार वर्षापासून राष्ट्रीय संघाशी जुळले आहेत.
भारताचा राष्ट्रीय संघाचा मिडफिल्डर लेनी रॉड्रिग्सला पुणो संघाने खरेदी केले. तर त्याचा संघसहकारी मेहताब हुसेनला कोची ब्लास्टर्सने विकत घेतले. गोव्याचा लेनी आणि कोलकात्याचा हुसेन पहिलांदाच आपल्या घरेलू संघाबाहेर खेळत आहेत. ‘स्पायडरमॅन’ नावाने प्रसिद्ध असलेला सुब्रत पॉल हा टीम मुंबईकडून खेळताना दिसेल. (क्रीडा प्रतिनिधी)
इंडिया सुपर लीगमध्ये खेळाडूंना जास्त पैसा मिळणार नाही. या स्पर्धेपासून मात्र फुटबॉलचे नुकसान होणार नाही. आयएसएलमध्ये मिळणारा पैसा खेळाडूंसाठी पुरेसा नाही़ या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव झाला असता
तर चांगले झाले असत़े त्यामुळे खेळाडूंना
अधिक पैसा मिळाला असता, मात्र, तसे
होणार नाही याचा खेद वाटतो.
- बायचुंग भुतिया
पुणो : लेनी रॉड्रिग्ज, धर्मराज रावनन, आशुतोष मेहता, ज्योकिम अब्रांचिस, प्रीतम कोटाल, मनीष मैथानी, इस्रेल गुरुंग.
मुंबई : सुब्रत पॉल, लालरिंदिका राल्टे, सय्यद रहिम नबी, राजू गायकवाड, सुभाष सिंह, राम मलिक, दीपक मंडल.
केरळ ब्लास्टर्स : मेहताब हुसेन, संदेश ङिांगन, इशफाक अहमद, गुरुविंदर सिंह, निर्मल छेत्री, सुशांत मॅथ्यू, गोडविन फ्रान्को.
बंगळुरू : हरमनज्योत खाबरा, धनचंद्र सिंह, जे.जे लालपेखलुआ, गौरमांगी सिंह, शिल्टन पाल, डेन्सन देवदास, खेलेम्बा मेतेई.
एटलेटिको डी कोलकाता : केविन लोबो, अर्णव मंडल, डेंजिल फ्रान्को, राकेश मसीह, मोहम्मद रफिक, विश्वजित साहा.
दिल्ली डायनोमोस : फ्रान्सिस फर्नाडिस, रॉबर्ट लालथामुआना, नाओबा सिंह, शायलो मालस्वाथलुआंगा, शोविक घोष, शोविक चक्रवर्ती, मुनमुन लुगुन.
गोवा संघ : लक्ष्मीकांत कट्टीमनी, देवब्रत रॉय, गॅब्रियल फर्नाडिस, क्लिफोर्ड मिरांडा, ज्वेल राजा शेख, एल्विन जॉर्ज आणि नारायण दास.
नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी : कुन्जुग भूतिया, जीवन सिंह,
दुर्गा बोरो, एबोरा खोंगजी, जोर्डिगलिआना राल्टे, टीपी रहनेश, बोईथांग हाओकिप.