नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, महिला कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, अंध क्रिकेट संघाचा कर्णधार शेखर नाईक, पॅराआॅलिम्पिक पदक विजेती दीपा मलिक, पॅरालिम्पियन मरियप्पन थांगवेलू, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश, थाळीफेकपटू विकास गौडा या आठ खेळाडूंना केंद्र शासनाने यंदा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.कोहलीने नुकतीच तिन्ही प्रकारांत भारतीय संघाची जबाबदारी सांभाळली.साक्षी मलिकने महिलांच्या ५८ किलो वजन गटात रिओ आॅलिम्पिकचे कांस्य जिंकले. थांगवेलू आणि दीपा मलिक यांनी रिओ पॅरालिम्पिकच्या महिला गोळाफेक एफ ५३ तसेच पुरुष उंच उडीत टी ४२ प्रकारात रौैप्यपदके जिंकली. दीपाला रिओ आॅलिम्पिकच्या व्हॉल्ट जिम्नॅस्टिकमध्ये चौथे स्थान मिळाले होते. श्रीजेश हा आॅलिम्पिकची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार होता. यंदा एकाही खेळाडूला पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला नाही. (वृत्तसंस्था)
कोहलीसह आठ खेळाडूंना ‘पद्मश्री’
By admin | Published: January 26, 2017 1:15 AM