शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

९१ भारतीय खेळाडू रिओ आॅलिम्पिकबाहेर!

By admin | Published: August 16, 2016 8:27 PM

भारतीय खेळाडूंचे ११८ जणांचे पथक आॅलिम्पिकमध्ये सहभागी झाले खरे पण दहा दिवसानंतरही पदकाची झोळी रिकामीच राहिली.

ऑनलाइन लोकमत

रिओ, दि. 16 - भारतीय खेळाडूंचे ११८ जणांचे पथक आॅलिम्पिकमध्ये सहभागी झाले खरे पण दहा दिवसानंतरही पदकाची झोळी रिकामीच राहिली. तब्बल ९१ खेळाडू आतापर्यंत बाहेर पडले हे विशेष. तिरंदाजी, बॉक्सिंग, हॉकी, पुरुष गोल्फ, जिम्नॅस्टिक, ज्युडो, रोर्इंग, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, टेनिस आणि भारोत्तोलन यातील आव्हान संपुष्टात आले आहे. अ‍ॅथ्लेटिक्स, महिला गोल्फ, बॅडमिंटन तसेच कुस्ती या खेळात काही चमत्कार घडेल व पदके मिळतील, इतकीच आशा बाळगायला हरकत नाही.नेमबाजीत सर्वाधिक निराशा झाली. गेल्या तीन आॅलिम्पिकमध्ये नेमबाजांना पदके मिळाली पण यंदा रिकाम्या हाताने परतावे लागले. १२ नेमबाजांपैकी जीतू राय आणि अभिनव बिंद्रा अंतिम फेरीत पोहोचले. अभिनवने दहा मीटर एअर रायफलमध्ये चौथे तर जीतूने दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात आठवे स्थान घेतले. अन्य नेमबाज आव्हान देखील सादर करू शकले नाहीत.गुरुप्रीतसिंग २५ मीटर फायर पिस्तुलमध्ये सातव्या, मिराज अहमद खान स्किटमध्ये नवव्या, जीतू राय ५० मीटर पिस्तुलमध्ये १२व्या, नारंग ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात १३ व्या आणि चैनसिंग ३६ व्या स्थानावर घसरला. प्रकाश नांजप्पा ५० मीटर पिस्तुलमध्ये २५ वा, गुरुप्रीत दहा मीटर एअर पिस्तुलमध्ये २० वा, मानवजीत संधू ट्रॅपमध्ये १६ वा आणि कीनन चेनई १९व्या स्थानी घसरला.तीन महिला नेमबाजांमध्ये अपूर्वी चंदेला दहा मीटर एअर रायफलमध्ये ३४ व्या, अयोनिका पाल ४३ व्या आणि हीना सिद्धू दहा मीटर एअर पिस्तुलमध्ये १४ व्या तसेच २५ मीटर एअर पिस्तुलमध्ये २० व्या स्थानी आली.तिरंदाजीत अतानू दास, दीपिका कुमारी आणि बोंबायल्या देवी हे उपउपांत्यपूर्व फेरीत बाद झाले. लक्ष्मीराणी मांझी पहिल्या फेरीत बाद झाली. दीपिका, बोंबायल्या आणि लक्ष्मी यांचा संघ उपउपांत्यफेरीत पराभूतहोऊन बाहेर पडला.बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा, मनू अत्री, सुमित रेड्डी हे सर्वजण आपापल्या गटात पराभूत झाले. बॉक्सिंगमध्ये विकास कृष्णा उपांत्यपूर्व फेरीत, मनोज कुमार उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेतर आणि शिवा थापाला सलामीलाच पराभव पत्करावा लागला. ३६ वर्षानंतर आॅलिम्पिक पदकाची आशा असलेले भारतीय पुरुष तसेच महिला संघ देखील साखळी सामन्यात पराभूत होऊन बाहेर पडले.११२ वर्षानंतर आॅलिम्पिकमध्ये पुनरागमन करणाऱ्या गोल्फमध्येही भारतीयांनी निराशाजनक कामगिरी केली. चौरसिया ५० व्या आणि अनिर्बान लाहिरी ५७ व्या स्थानावर राहिला. जिम्नॅस्टिकमध्ये मात्र दीपा कर्माकरने आॅल राऊंड प्रकारात ५१ वे आणि वॉल्टमध्ये फायनलमध्ये ऐतिहासिक चौथे स्थान घेतले.ज्युडोमध्ये अवतारसिंग दुसऱ्या फेरीत गारद झाला. रोर्इंगमध्ये दत्तू बबन भोकनळ १३व्या, जलतरणात साजन प्रकाश २८ व्या आणि शिवानी कटारिया ४१ व्या स्थानावर आले.टेटे प्रकारात अचंता शरथ कमल, सौम्यजीत घोष, मणिका बत्रा आणि मौमा दास पहिला अडथळा देखील पार करू शकले नाहीत. टेनिसमध्ये लियांडर पेस-रोहण बोपन्ना, सानिया मिर्झा- प्रार्थना ठोंबरे हे पहिल्या फेरीत पराभूत झाले.सानिया-बोपन्ना मिश्र प्रकारात कांस्य पदक जिंकू शकले नाहीत.वेटलिफ्टिंगमध्ये सतीश शिवलिंगम ७७ किलो वजन गटात ११ व्या, तर सेखोम मीराबाई चानू ४८ किलोगटात स्पर्धा पूर्ण करण्यात अपयशी ठरली. कुस्तीच्या ग्रिको रोमन प्रकारात रवींदर खत्री सलामीला पराभूत झाला.अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये १० व्या, सुधा सिंग ३० व्या, दूतीचंद १०० मीटरमध्ये, शर्बनी नंदा २०० मीटर , निर्मला शरण ४०० मीटर हिटमध्ये बाहेर झाले. गोळाफेकीत मनप्रीत कौर २३ व्या, थाळीफेकीत सीमा पुनिया २० व्या, महिला मॅरेथॉनमध्ये ओपी जैशा ८९ व्या आणि कविता राऊत १२० व्या स्थानी आली. मोहम्मद अनस ४०० मीटर, जिनसन जॉन्सन ८०० मीटर प्रकारात हिटमध्ये बाद झाले तर २० किमी पायी चालण्याच्या शर्यतीत मनीष सिंग १३ व्या स्थानी आला. गणपती कृष्णन् आणि गुरमितसिंग यांना अपात्र घोषित करण्यात आले. अंकित शर्मा लांबउडीत २४ व्या, रंजीत माहेश्वरी तिहेरी उडीत३० व्या आणि विकास गौडा थाळीफेकीत २८ व्या स्थानावर राहिला.