आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवसाची सुरुवात धमाकेदार झाली. आजपासून खेळांमध्ये अॅथलेटिक्स स्पर्धांनाही सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच मुलांनी वर्ल्ड रेकॉर्डसह गोल्ड जिंकलं, तर मुलींनीही जोरदार कामगीरी केली. मुलींनी विक्रम मोडत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. साकेथ आणि राजकुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. साकेथ मायनेनीने त्याचे तिसरे आशियाई खेळ पदक (२०१४ मध्ये २) जिंकले होते, रामकुमार रामनाथनसह त्याच्या जोडीने अंतिम फेरीत हरल्यानंतरही रौप्यपदक मिळवले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने नेमबाजीत आणखी एक सुवर्णपदक पटकावले आहे. ऐश्वर्या, स्वप्नील आणि अखिल या जोडीने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. ऐश्वर्या प्रताप सिंग, स्वप्नील आणि अखिल या तिघांनी शूटिंगमध्ये कमाल केली आहे. तिघांनी मिळून ५० मीटर रायफल ३ पोझिशन पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या तिघांनी १७६९ स्कोर केला. चीनच्या जिया मिंग, लिनशू आणि हाओ यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर या स्पर्धेचे कांस्यपदक कोरियाने मिळवले.
ऐश्वर्या, स्वप्नील आणि अखिल यांनी विद्यमान जागतिक विक्रम ८ गुणांनी मोडून पुरुषांच्या ५० मीटर रायफल 3P मध्ये सांघिक सुवर्ण जिंकले. स्वप्नील आणि ऐश्वर्या या दोघांनी ६०० पैकी ५९१ गुण मिळवले, जो नवीन पात्रता आशियाई विक्रम आहे. तिन्ही भारतीय टॉप ८ मध्ये होते, अखिल शेओरानने ५८७ गुणांसह प्रभावी ५ वे स्थान मिळविले, पण त्याला अंतिम फेरीला मुकावे लागेल कारण नियमानुसार दोन खेळाडूंना एनसीओ मिळते.
याशिवाय ईशा सिंग, पलक आणि दिव्या टीएस या तिघींनी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. भारतीय संघ चीनपेक्षा ५ गुणांनी मागे राहिला आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ईशाचे हे हँगझोऊ गेम्समधील तिसरे पदक आहे. ईशा आणि पलक यांनीही वैयक्तिक अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. ईशा सिंग, पलक आणि दिव्या यांचा संघ १७३१-५० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चीनच्या रँक्सिंग, ली आणि नान या जोडीने सुवर्णपदक पटकावले आहे.
भारताच्या पदकांची संख्या आता २७ वर पोहोचली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताने नेमबाजीत एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. यापूर्वी, या खेळांच्या ५व्या दिवशी भारत ६ सुवर्ण, ८ रौप्य आणि ११ कांस्य पदकांसह ५ व्या स्थानावर होता.