Vedaant Madhavan : अभिनेता आर माधवनचा (R Madhavan) मुलगा वेदांत (Vedaant Madhavan) एक उत्तम जलतरणपटू असून, त्याने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलुट केली आहे. यातच आता मध्य प्रदेशात झालेल्या 'खेलो इंडिया' युवा क्रीडा स्पर्धेतही वेदांत माधवनने जलतरण स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी केली आहे. वेदांतने 5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांसह एकूण 7 पदके जिंकली आहेत.
खेलो इंडिया युथ गेम्समध्ये (Khelo India Youth Games) महाराष्ट्राच्या वतीने वेदांत सहभागी झाला होता. आर माधवननेही सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या मुलाच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला, माधवनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "अपेक्षा फर्नांडिस आणि वेदांत यांची कामगिरी पाहून मला खूप आनंद झाला आहे. मी शिवराज सिंह चौहान आणि अनुराग ठाकूर यांचे आभार मानोतो, ज्यांनी हे अतिशय सुंदर पद्धतीने आयोजित केले आहे."
दुसऱ्या ट्विटमध्ये आर माधवनने मुलगा वेदांतने कोणत्या प्रकारात सुवर्णपदक जिंकले, याची माहिती दिली आहे. माधवनने आनंद व्यक्त करत मुलचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘देवाच्या कृपेने 100 मीटर, 200 मीटर आणि 1500 मीटरमध्ये सुवर्ण. 400 मीटर आणि 800 मीटरमध्ये रौप्यपदक." विशेष म्हणजे, यावेळी खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राकडून चांगली कामगिरी झाली आहे. यंदा जलतरण संघाने 1 ट्रॉफी आणि 2 एकूण चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकल्या.
वेदांतची आतापर्यंतची उत्कृष्ट कामगिरीवेदांत माधवनबद्दल सांगायचे तर, या 17 वर्षीय जलतरणपटूने आतापर्यंत अनेक जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. वेदांतने आपल्या ध्येयाबद्दल सांगितले की, त्याला भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे. 2021 मध्ये अभिनेता आर माधवन आणि त्याची पत्नी सरिता आपल्या मुलाच्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी दुबईला गेले होते.