Neeraj Chopra - वर्ल्ड चॅम्पियन बनूनही नीरज चोप्राचे ( Neeraj Chopra) पाय जमिनीवरच आहेत... ऑलिम्पिक सुवर्ण आणि जागतिक स्पर्धेतील सुवर्ण... जिंकणारा तो नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यानंतरचा दुसरा भारतीय आहे. पण, जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. पण, हा इतिहास घडवूनही नीरज पहिल्यासारखाच सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसला. बुडापेस्ट येथे उपस्थित भारतीयांचे त्याने आभार मानले. पाकिस्तानी मित्र अन् प्रतिस्पर्धी अर्शद नदीमसोबत त्याने फोटोही काढले... भारतीय पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. नीरज हा फक्त भारतापुरता मर्यादित नाही, तर तो जगात फेमस आहे. म्हणूनच त्याची पत्रकार परिषद संपताच हंगेरियन महिला त्याच्याजवर तिरंगा घेऊन आली अन् त्यावर तिने गोल्डन बॉयचा ऑटोग्राफ मागितला. पण, त्याने वहा साईन नही कर सकता असे स्पष्ट सांगितले अन् त्या महिलेच्या टी शर्टवर ऑटोग्राफ दिला.
''पहिला थ्रो मला चांगला फेकायचा होता, परंतु तांत्रिक फाऊल झाला. त्यानंतर थोडा निराश झालो, परंतु मी स्वतःला अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी पूश केलं. भारतवासीयांना हे सांगू इच्छितो की, हे तुमचं पदक आहे. आज जागे राहून माझी मॅच पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे आभार. मी आता ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन आहे. तुम्हीही जगात देशाचे नाव मोठं करू शकता. त्यासाठी मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा,'' असेही तो म्हणाला.