Paris Olympics 2024 : २६ जुलैपासून सुरू होत असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे शिलेदार सज्ज आहेत. एकूण ११७ खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. ३३ खेळांमध्ये जगभरातील १० हजारहून अधिक खेळाडू आपले नशीब आजमवतील. येत्या २६ तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात होईल आणि ११ ऑगस्टला स्पर्धेचा शेवट होईल. तमाम भारतीय आपल्या खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवत आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळीही ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देत आहे.
या ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंची अंतिम यादी समोर आली आहे. एकूण ११७ खेळाडू तिरंग्याची शान वाढवण्यासाठी मैदानात असतील. भारतीय खेळाडूंसह १४० सपोर्ट स्टाफचा समावेश आहे, ज्यात ७२ अधिकारी आहेत. खेळाडूंसह सर्व सदस्यांचा शासनाकडून प्रवासाचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणारे भारतीय खेळाडू -
- तिरंदाजी - दीपिका कुमारी, धीरज बोम्मदेवरा, प्रवीण जाधव, तरूणदीप राय, भजन कौर, अंकिता भगत.
- ॲथलेटिक्स - नीरज चोप्रा, किशोर जेना, अब्दुल्ला अबुबकर, मोहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अक्शदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग बिष्ट, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पारूल चौधरी, ज्योती याराजी, किरण पहल, तेजिंदरपाल सिंग तूर, आभा खटुआ, अनु राणी, सर्वेश कुशारे, प्रवीण चित्रावेल, अमोज जेकब, संतोष तमिलरासन, राजेश रमेश, मिजो चाको कुरियन, विद्या रामराज, ज्योतिका श्री दांडी, एमआर पूर्वम्मा, सुभा व्यंकटेशन, प्राची, सूरज पवार, जेसव्हिन एल्ड्रिन, किरण पाल.
- बॅडमिंटन - पी.व्ही सिंधू, चिराग शेट्टी, सात्विक साईराज रेड्डी, एचएस प्रणय, लक्ष्य सेन, अश्विनी पोनप्पा, तनिशा क्रास्तो.
- बॉक्सिंग - अमित पंघाल, निखत जरीन, लवलीना बोरगोहेन, जॅसमीन लबोडिया, प्रीती पवार, निशांत देव.
- इक्वेस्ट्रियन (घोडेस्वारी) - अनुष अगरवाल.
- गोल्फ - शुभांकर शर्मा, गगनजीत भुल्लर, अदिती अशोक, दीक्षा डागर.
- हॉकी - गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश. बचावपटू : जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय. मध्यरक्षक : राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद. आक्रमक : अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मंदीप सिंग, गुरजंत सिंग.
- नेमबाजी - मनू भाकर, ईशा सिंग, अंजुम मौदगिल, ऐश्वर्या प्रताप तोमर, राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग, अनंतजीत सिंग, रायजा धिल्लन, माहेश्वरी चौहान, संदीप सिंग, अर्जुन बाबौता, एलेनविले वालारिवन, रमिता जिंदाल, स्वप्नील कुसाळे, सिफ्ट कौर संगरा, रैझा धिल्लन. सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग चीमा.
- सेलिंग - विष्णू सरवनन, नेत्रा कुमानन
- टेबल टेनिस - शरत कमल, मनिका बत्रा, श्रीजा अकुला, हरमीत देसाई, मानव ठक्कर, अर्चना कामत.
- टेनिस - सुमित नागल, रोहन बोपन्ना, श्रीराम बालाजी.
- कुस्ती - विनेश फोगाट, अंशु मलिक, अमन सेहरावत, निशा दहिया, रितीका हुडा, अंतिम पंघाल.
- वेटलिफ्टिंग - मीराबाई चानू
- पोहणे – धिनिधी देसिंगू, श्रीहरी नटराज
- रोव्हिंग - बलराज रोव्हिंग
- ज्युडो - तुलिका मान
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधून भारताला चांगल्या पदकांची आशा असेल. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदके जिंकली होती. तेव्हा ११९ खेळाडू मैदानात होते. नीरज चोप्राच्या रूपात भारतात एकमेव सुवर्ण पदक आले. तर दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांनी भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली.