शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आशियाई नेमबाजीत अभिनव बिंद्राला सुवर्ण

By admin | Published: September 28, 2015 1:40 AM

आॅलिम्पिक सुवर्ण विजेता‘ गोल्डन बॉय’ अभिनव बिंद्रा याने आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत रविवारी दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले

नवी दिल्ली : आॅलिम्पिक सुवर्ण विजेता‘ गोल्डन बॉय’ अभिनव बिंद्रा याने आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत रविवारी दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये बिंद्राने २०८.८ गुणांसह सुवर्णांवर नेम साधला. लंडन आॅलिम्पिकचा कांस्य विजेता गगन नारंग हा चौथ्या आणि चैनसिंग सहाव्या स्थानावर राहिले. बिंद्रा, नारंग आणि चैनसिंग हे २०१६ च्या रियो आॅलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरले आहेत.३२ वर्षांच्या बिंद्रापाठोपाठ कझाखस्तानचा विश्व क्रमवारीत आठव्या स्थानावरील युरकोव्ह युकिरी याने २०६.६ गुणांसह दुसरे आणि कोरियाचा यू जीचूल १८५.३ याने तिसरे स्थान मिळविले. लंडन आॅलिम्पिकमध्ये याच प्रकारात कांस्य जिंकणाऱ्या नारंगला १६४.५ गुण मिळाल्याने तो चौथ्या स्थानावर घसरला. चैनसिंग हा १२२.७ गुणांसह सहाव्या स्थानावर आला. नारंगने १०.६ गुणांचे दोन शॉट मारून चांगली सुरुवात केली खरी पण पुढच्या प्रयत्नांत तो माघारला. चैनसिंग याला शूट आॅफमध्ये कोरियाच्या खेळाडूने मागे टाकले. बिंद्रा याने चांगली कामगिरी कायम ठेवून सर्वच प्रतिस्पर्धी खेळाडूंना मागे टाकले.गगनसोबत कुठल्याही प्रकारची स्पर्धा नसल्याचे स्पष्ट करीत अभिनव म्हणाला,‘असे केवळ मीडियात वाचायला मिळते.’ भारताचे रायफल कोच स्टेनिसलाव लेपिड्स यांना बिंद्राच्या कर्तृत्वावर शंका नव्हतीच. ते म्हणाले,‘या निकालाबद्दल मला शंका नव्हतीच. या प्रकारात गगनला देखील यश मिळावे, अशी मला अपेक्षा होती. गगन भविष्याची तयारी करीत आहे.’भारताने १० मीटर एअर रायफलचे सांघिक सुवर्णदेखील जिंकले. बिंद्रा, नारंग आणि चैनसिंग यांच्या जोडीने १८६८.६ गुणांसह अव्वल स्थान घेतले. कोरिया संघ दुसऱ्या आणि सौदी अरब संघ तिसऱ्या स्थानावर आला. भारताने युवा गटात एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली. ज्युनियर गटातही दोन रौप्य पदके मिळाली. सत्यजित कंडोल याने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकले. त्याने २०४.८ गुण, चायनीज तायपेईचा शाओ चुआन लू याने २०३.७ आणि इराणचा दवोद अबाली अब्बासाली याने १८३.८ गुण मिळविले. कंडोल, मिथिलेश आणि गजेंद्र राज यांनी याच प्रकारात १८२७.७ गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. कोरियाने सुवर्ण जिंकले. ज्युनियर गटात प्रणतिक बोस याने २०३.९ गुणांसह रौप्य जिंकले. इराण आणि कोरियाच्या खेळाडूंनी क्रमश: सुवर्ण आणि कांस्य पटकाविले. बोसने यानंतर प्रशांत आणि अखिल शेरॉन यांच्या सोबतीने सांघिक प्रकराचे रौप्य पटकावले. इराणचा संघ अव्वल स्थानावर राहिला. कोरियाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.(वृत्तसंस्था)