शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अभिषेक नायरने मुंबईकरांना तारले

By admin | Published: December 28, 2016 3:09 AM

अष्टपैलू अभिषेक नायरने प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर बलाढ्य मुंबईने हैदराबादचा झुंजार प्रतिकार ३० धावांनी मोडून काढताना रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या

रायपूर : अष्टपैलू अभिषेक नायरने प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर बलाढ्य मुंबईने हैदराबादचा झुंजार प्रतिकार ३० धावांनी मोडून काढताना रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नायरने ४० धावांमध्ये ५ बळी घेतले. तर, युवा फिरकीपटू विजय गोहिलनेही ६४ धावांत ५ बळी घेत हैदराबादचे आव्हान संपुष्टात आणण्यात योगदान दिले. मुंबईने दिलेल्या २३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव २०१ धावांत संपुष्टात आला. चौथ्या दिवशी नाबाद राहिलेल्या बी. अनिरुध्दने १८७ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह सर्वाधिक ८४ धावांची शानदार खेळी केली. परंतु, संघाला विजयी करण्यास तो अपयशी ठरला. पाचव्या दिवशी हैदराबादने ७ बाद १२१ धावांवरुन खेळण्यास सुरु केली. यावेळी त्यांना विजयासाठी १११ धावांची गरज होती व त्यांच्या सर्व आशा अनिरुध्दवर होत्या. मात्र, नायरने अचूक मारा करताना उर्वरीत तिन्ही बळी घेत हैदराबादच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. अनिरुध्द आणि चामा मिलिंद (२९) यांनी आठव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करुन हैदराबादच्या आशा उंचावल्या. यावेळी मुंबईवर देखील दडपण आले. परंतु, नायरने मिलिंदला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर लगेच मोहम्मद सिराजला भोपळा ही न फोडू देता पायचीत पकडले. झटपट दोन बळी गेल्यानंतर अनिरुध्दवर दडपण आले. अखेरचा फलंदाज रवि किरणसह (१) त्याने १६ धावांची भागीदारी केली. मात्र, नायरने किरणचाही अडसर दूर करताना त्याला आदित्य तरेकरवी झेल बाद करुन मुंबईचा उपांत्य प्रवेश निश्चित केला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : मुंबई (पहिला डाव) : १०१.४ षटकात सर्वबाद २९४ धावा. हैदराबाद (पहिला डाव) : १२५.१ षटकात २८० धावा. मुंबई (दुसरा डाव) : ८३.२ षटकात सर्वबाद २१७ धावा (आदित्य तरे ५७, आदित्य तरे ४६; मोहम्मद सिराज ५/५२). हैदराबाद (दुसरा डाव) : ७१ षटकात सर्वबाद २०१ धावा (बी. अनिरुध्द नाबाद ८४, बी. संदीप २५; अभिषेक नायर ५/४०, विजय गोहिल ५/६४)