ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 31 - विराट कोहलीच्या खांद्याची दुखापत बरी न झाल्यास त्याच्या अनुपस्थितीत द. आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व करेल. खांदेदुखीमुळेच फलंदाज लोकेश राहुल हा देखील खेळणार नाही. तो सर्जरीसाठी लंडनला रवाना होणार आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध पुण्याच्या पहिल्या कसोटीत लोकेशला दुखापत झाली होती. पण दुखणे सांभाळून तो खेळत राहिला.विराटबाबत आरसीबीचे कोच डॅनियल व्हेट्टोरी म्हणाले, सध्यातरी विराटच्या खेळण्याबद्दल स्पष्टता नाही. विराट बाहेर झाल्यास डिव्हिलियर्स नेतृत्व करेल. कोहली २ एप्रिलला संघात सहभागी होणार असून बीसीसीआयच्या फिजिओकडून त्याची उपलब्धता निश्चित होणार आहे. विराट आणि राहुलच्या अनुपस्थितीत सर्फराज खान याला सुरुवातीच्या सामन्यात संधी मिळू शकते. याशिवाय राखीव बाकावर काही प्रतिभवान खेळाडू असल्याची माहिती देत व्हेट्टोरी पुढे म्हणाले, मनदीपसिंग हा चांगला फलंदाजआहे. जवळपास 15 सामने खेळायचे असल्याने खेळाडूंना विश्रांती मिळण्याच्या हेतूने आम्ही वेळापत्रक तयार करीत आहोत. सर्वांना संधी मिळावी असा यामागील विचार आहे. मिशेल स्टार्कच्या अनुपस्थितीबाबत व्हेट्टोरी म्हणाले, टायमल मिल हा स्टार्कचे स्थान घेणार असून आमच्या डावपेचानुसार स्टार्कची उणीव मिल भरून काढू शकतो.
कोहलीच्या अनुपस्थितीत डिव्हिलियर्सकडे आरसीबीचे नेतृत्व
By admin | Published: March 31, 2017 8:17 PM