पॅरिस : मोठ्या स्पर्धेत खेळू न शकणे हे कोणत्याही फुटबॉलपटूसाठी वाईट स्वप्नासारखेच असते आणि या आठवड्यात सुरू होत असलेल्या युरो कपमध्येदेखील काही स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांना हाती निराशा पडणार आहे.मैदानावर आपला वेग आणि त्याच्या जोडीला आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा जर्मनीचा मिडफिल्डर मार्को रियूस दुखापतीमुळे युरो कपमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. पाय आणि पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला २0१0 आणि २0१४ च्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेतही खेळता आले नव्हते.आघाडीच्या फुटबॉलपटंूमध्ये समाविष्ट असणारा हॉलंडचा कर्णधार आर्जेन रॉबेन हादेखील युरो कपमध्ये खेळताना दिसणार नाही. हॉलंडचा संघ स्पर्धेसाठी पात्र न ठरू शकणाऱ्या तुल्यबळ संघांपैकी एक आहे. स्पर्धेत हॉलंडचा संघ नसल्यामुळे प्रेक्षक मैदानात आर्जेनची जादू पाहण्यापासून वंचित राहतील.युरो कपमध्ये खेळू न शकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बेल्जियमचा कर्णधार विन्सेंट कोम्पनी व स्पेनचा डिएगो कोस्टादेखील आहेत. दुखापतीशी संघर्ष करीत असणाऱ्या या खेळाडूंना आपला या वेळेस जलवा दाखविण्याची संधी मिळणार नाही.>११ जूनपासून सुरू होणाऱ्या युरो कप २0१६ मध्ये यजमान फ्रान्सला स्टार स्ट्रायकर करीम बेनजेमा याच्या अनुपस्थितीमुळे जोरदार धक्का बसला आहे. जगातील सुरेख स्ट्रायकर्समध्ये गणला जाणारा २८ वर्षीय बेनजेमाला फ्रान्स फुटबॉल महासंघाने सहकारी खेळाडू मॅथ्यू वल्बुएना याला ब्लॅकमेल करण्याच्या आरोपामुळे निलंबित केले आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींना त्याचा जलवा पाहण्याची संधी मिळणार नाही.
युरो चषकात मध्ये ‘स्टार्स’ची गैरहजेरी
By admin | Published: June 10, 2016 3:53 AM