शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

पुण्याच्या आघाडीच्या फळीने जबाबदारी स्वीकारावी

By admin | Published: May 12, 2017 12:57 AM

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाबाबत एक बाब मात्र निश्चित आहे. हा संघ प्रतिस्पर्ध्यांसाठी जेवढा धोकादायक आहे, तेवढाच स्वत:च्या खेळाडूंसाठीही

रवी शास्त्री लिहितात...दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाबाबत एक बाब मात्र निश्चित आहे. हा संघ प्रतिस्पर्ध्यांसाठी जेवढा धोकादायक आहे, तेवढाच स्वत:च्या खेळाडूंसाठीही आहे. म्हणजेच दिल्ली संघ प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एकतर्फी विजय मिळवतो किंवा स्वत: चुका करीत हाताशी असलेला विजय घालवतो. डेअरडेव्हिल्स संघाच्या या कामगिरीमुळे आज, शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत पुणे संघाचे पारडे वरचढ आहे. पुणे संघासाठी ही लढत महत्त्वाची आहे. पुणे संघ बाद फेरीमध्ये स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे. संघाचे लक्ष्य अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवण्याचे आहे. दिल्ली संघ जेवढ्या वेगाने धावा फटकावतो तेवढ्याच वेगाने धावा बहालही करतो. बळी घेण्यास अपयशी ठरल्यास त्यांची कामगिरी निराशाजनक दिसते. पण त्यांचा दिवस असेल तर दिल्लीची फलंदाजीची बाजू अधिक मजबूत भासते. या लढतीत जर असे घडले तर पुणे संघाकडे दिल्लीला रोखण्याचे फार अधिक पर्याय उरणार नाहीत. शिस्तीचा विचार करता पुणे संघ आघाडीवर आहे. त्याचमुळे त्यांनी या स्पर्धेत मोठा पल्ला गाठला आहे. दिल्लीबाबत विचार करता उलट स्थिती आहे. सुमार कामगिरीमुळे दिल्ली संघाने चाहत्यांना निराश केले आहे. संघात जर काही उत्साह शिल्लक असेल तर तो आपल्याला लवकरच अनुभवाला मिळेल. दिल्लीच्या युवा खेळाडूंकडे डाव सावरण्याचे कसब नसल्याचे दिसून येते. त्यांचे मेंटॉर असलेल्या राहुल द्रविडची ही खासियत होती, हे विशेष. हे युवा खेळाडू कुठल्याही चेंडूवर षटकार ठोकतात तर पुढच्याच चेंडूवर धावबाद होतात. त्यांच्याबाबत काही सांगता येत नाही. पुणे संघाला आघाडीच्या फळीकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. धोनीला सूर गवसणे यापेक्षा चांगली बाब काय असू शकते. स्टीव्ह स्मिथलाही अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. (टीसीएम)