ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - भारताचा शैलीदार फलंदाज युवराज सिंगच्या अनेक खेळी तुमच्या आठवणीत असतील. स्मार्ट आणि स्टायलिश युवी तरुणांचा आयकॉन ठरला होता. क्रिकेटच्या मैदानात उतरण्यापूर्वी युवीने चित्रपटातसुद्धा काम केले होते, हे मात्र फार थोड्या जणांना माहीत आहे.
वडील योगराज सिंग यांच्या पावलावर पाऊल ठेवत युवीने बालवयातच क्रिकेटच्या खेळपट्टीवर पाऊल टाकले होते. मात्र याचदरम्यान युवीला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. तो 11 वर्षांचा असताना त्याने अभिनेता आणि गायक हंसराज हंस याच्यासोबत एका पंजाबी चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाचे नाव होते मेहंदी शगना दी. त्यानंतर पुढच्या काळात युवीचे नाव बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. पण युवीने चित्रपटांमध्ये काम मात्र केले नाही.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये युवराज सिंगने आपला एकदिवसीय कारकिर्दीतील 300 वा सामना खेळला होता. तसेच आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सातव्यांदा अंतिम फेरीत खेळण्याचा विक्रमही केला होता. या स्पर्धेत त्याने पाकिस्तानविरुद्ध सलामीच्या लढतीत केलेली खेळी संस्मरणीय ठरली होती. स्पर्धेदरम्यान 300 व्या सामन्याबाबत बोलताना युवराजने संघातून बाहेर गेल्यानंतर पुन्हा भारतासाठी खेळण्याचा आनंद आहे, मी सध्या चांगला खेळत आहे, जोपर्यंत मी चांगला खेळत राहील मला भारतासाठी खेळायला आवडेल. आणखी काही वर्ष भारतासाठी खेळेन अशी आशा व्यक्त केली होती.
(1992) 11 yr old Yuvraj Singh in the Punjabi film "Mehndi Shagna Di".#INDvPAK#IndVsPak#YuvrajSinghpic.twitter.com/TdV4z9oXgM— Film History Pics (@FilmHistoryPic) June 18, 2017