रिओ : आॅलिम्पिकमध्ये तब्बल ११२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर समावेश झालेल्या गोल्फ खेळात भारताची १८ वर्षीय अदिती अशोकला ४१व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तीने फाईव्ह ओव्हार ७६ गुणांची खेळी केली. यंदा गोल्फसाठी विविध देशांमधून एकूण ६४ तर जगातील सर्वोत्कृष्ट १० गोल्फपटू सहभागी झाले होते. रिओमार येथिल आॅलिम्पिक गोल्फ कोर्सवर झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अदिती पहिल्या ८ क्रमांकात होती, त्यावेळी तीचे गुण ६८-६८ असे होते. तिसऱ्या दिवशी मात्र, आपल्या खेळात सातत्य राखता न आल्यामुळे तीला ७९ गुणांवर समाधान मानावे लागले. त्याचवेळी, चौथ्या दिवशी देखील सुर न गवसल्यामुळे तीला अखेर ७६ गुणांवर समाधान मानवे लागले. विशेष म्हणजे आदितीला यावेळी एकही बर्डी केलता आली नाही. फक्त तीन बोगीज् आणि एक डबल बोगीची खेळी केल्यामुळे तीला सेव्हन ओव्हर २९१ गुणांवर समाधान मानावे लागले.
आदिती अशोक ४१ व्या क्रमांकावर
By admin | Published: August 22, 2016 4:56 AM