शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

अडवाणी १४ व्यांदा विश्वविजेता

By admin | Published: September 28, 2015 1:44 AM

भारताचा सर्वाधिक यशस्वी बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणी याने स्वत:च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवताना रविवारी १४ व्यांदा विश्व चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.

अ‍ॅडिलेड : भारताचा सर्वाधिक यशस्वी बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणी याने स्वत:च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवताना रविवारी १४ व्यांदा विश्व चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. येथे आटोपलेल्या आयबीएसएफ विश्व बिलियर्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ३० वर्षांच्या पंकजने फायनलमध्ये सिंगापूरचा पीटर गिलख्रिस्ट याच्यावर ११६८ गुणांनी मात केली. १४ व्या विश्वविजेतेपदाबद्दल पंकज म्हणाला,‘ गुणांवर आधारित लढत पीटरला गमविल्यानंतर पराभवाची परतफेड करण्याचा निर्धार केला होता. मी मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या भावाचा सल्ला घेतला शिवाय रात्री छान झोप घेतली. फायनलच्या आदल्या रात्री केलेल्या या दोन गोष्टींमुळे मी येथे विश्वविजेता बनू शकलो. बेंगळुरूचा ‘ गोल्डन बॉय’ असलेल्या पंकजने जेतेपदासोबतच वेळेनुसार असलेल्या प्रकारातील जेतेपद कायम राखले. गिलख्रिस्टकडून पंकज आठवडाभरापूर्वी गुणांच्या प्रकारात पराभूत झाला होता.पंकजने सुरुवातीला १२७ गुण घेत आघाडी संपादन केली. नंतर गिलख्रिस्टच्या कमकुवतपणाचा लाभ घेत आणखी ३६० आणि ३०१ गुणांची कमाई करीत पाच तासांच्या या सामन्यातील पहिल्या तासात पंकजने सामन्यावर पकड निर्माण केली होती. ७०० गुणांच्या आघाडीनंतरही पंकजने २८४, ११९, १०१ आणि १०६ अशी कमाई केल्याने मध्यंतरापर्यंत त्याच्याकडे ११०० गुणांची आघाडी झाली होती.उत्तरार्धातही अडवाणीने दोनदा आघाडी घेतली पण पीटरने काही गुण मिळवित पंकजची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अडवाणीने पुन्हा ४३० गुणांची कमाई करीत पीटरचा पराभव निश्चित केला होता. ३०० मिनिटांच्या या सामन्यात अंतिम गुणफलक २४०८-१२४० असा होता. अडवाणीने जेतेपदासह वेळेच्या प्रकारात जेतेपदावर वर्चस्व कायम राखले आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये पंकज दोन्ही प्रकाराचा विश्व चॅम्पियन बनला.(वृत्तसंस्था)