शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

आयपीएलमध्ये खेळल्याचा फायदा : ख्रिस गेल

By admin | Published: March 18, 2016 3:34 AM

खेळपट्टीवर टिकून राहणे हे माझे पहिले लक्ष्य होते. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर नैसर्गिक खेळ करण्यास मदत मिळाली. त्यामुळेच मी खेळण्याचा पुरेपूर आनंद घेत संघाला विजय मिळवून

मुंबई : खेळपट्टीवर टिकून राहणे हे माझे पहिले लक्ष्य होते. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर नैसर्गिक खेळ करण्यास मदत मिळाली. त्यामुळेच मी खेळण्याचा पुरेपूर आनंद घेत संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरलो, आयपीएलमध्ये खेळल्याचा फायदा झाला, असे वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने सांगितले.इंग्लंडविरुध्द केलेल्या झंझावाती शतकानंतर गेलने आपल्या खेळीविषयी प्रतिक्रीया दिली. या सामन्याविषयी गेल म्हणाला कि, ‘इंग्लंडविरुद्ध आमची तयारी चांगली झाली होती. आम्ही सुरुवातीपासूनच जिंकण्याच्या निर्धाराने उतरलो होतो. मार्लाेन सॅम्युअल्स चांगली फटकेबाजी करीत होता आणि त्याच्या खेळीमुळे आम्हाला आमचा डाव सावरण्याची मदत मिळाली. सुरुवातीला बळी जाणार नाही याची खबरदारी आम्हाला घ्यायची होती.’‘खेळपट्टीवर टिकून राहिल्याने मोठे फटके खेळण्याचा आत्मविश्वास मिळाला. शेवटपर्यंत टिकताना इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुध्द वेस्ट इंडिजला विजय मिळवून देऊ शकलो याचा आनंद आहे’, असेही गेलने सांगितले. आयपीएलमध्ये खेळण्याचा फायदा मिळाल्याचे सांगताना गेल म्हणाला की, ‘संघातील अनेक खेळाडू आयपीएलनिमित्ताने येथे खेळले असल्याने त्यांना खेळपट्टी ओळखीची होती. पुढील सामना श्रीलंकेविरुध्द बंगळुरु येथे खेळायचे असून या सामन्यातही आम्ही आमचा फॉर्म कायम राखू.’गेल इतर संघांसाठी धोकादायक....ख्रिस गेलने इतर संघांना धोक्याचा इशारा देताना पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुध्द तुफानी खेळी केली. गेलच्या या खेळीनंतर भारताचे माजी कर्णधार लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही गेलचा सध्याचा फॉर्म इतर संघांसाठी खूप धोकायक असल्याचे सांगून सर्वच संघांना गेल पासून सावध राहण्याचे सूचित केले. ‘गेल असा फलंदाज आहे ज्याच्या खेळीविरुध्द तुम्ही भाकीत करु शकणार नाही. जोपर्यंत गेल खेळपट्टीवर असतो तोपर्यंत विंडिजच्या विजयाच्या आशा जिवंत असतात. लक्ष्य किती आहे याचा गेलवर काहीही फरक पडत नाही.’गेल क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम स्फोटक फलंदाज असून ‘विश्वाचा बॉस’ गेलला या प्रकारे खेळताना मजेशीर असते. इंग्लंडने आम्हाला मोठे आव्हान दिले होते. मात्र गेलने आपल्या तुफानी फलंदाजानीने हे लक्ष्य सहजतेने पार करुन दिले. - डॅरेन सैमी, कर्णधार, वेस्ट इंडिजवेस्ट इंडिजला विजयाचे पूर्ण श्रेय जाते. त्यांच्याकडून सामना खेचण्यात आम्ही अपयशी ठरलो. गेलने खरोखरंच अद्भुत फलंदाजी केली. जेव्हा गेल फॉर्ममध्ये असतो तेव्हा कोणत्याही संघाला त्याला रोखणे कठीण असते. - इआॅन मॉर्गन, कर्णधार - इंग्लंडविंडिजचे खेळाडू आयपीएल खेळतात याचा त्यांना फायदा झाला. आयपीएलमध्ये आमचे जास्त खेळाडू नाहीत, ही चांगली गोष्ट नाही. ही एक चांगली स्पर्धा असून पुढील वर्षी यात आमचे जास्त खेळाडू सहभागी होतील, अशी मला आशा वाटते. - जोस बटलर, इंग्लंड