नवी दिल्ली : आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) इंडियन सुपर लीगला (आयएसएल) अखेर अधिकृत मान्यता प्रदान केली. त्यामुळे आता देशात २0१७-१८ पासून दोन राष्ट्रीय लीग होतील.या लीगला पहिली तीन वर्षे एएफसीची मान्यता नव्हती व गेल्या काही कालावधीपासून त्यांनी मान्यतेसाठी प्रयत्न केला होता. एएफसीने अखेर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) प्रस्ताव मान्य केला. एआयएफएफच्या एका पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एएफसीने महासंघाला यासंदर्भात पत्र पाठवले व त्यावर सचिव डातो विंडसर यांची स्वाक्षरी आहे.’आता आयलीग विजेता एएफसी चॅम्पियन्स लीग क्वालिफायरमध्ये सहभाग घेईल, तर पुढील आयएसएल चॅम्पियन एएफसी कप क्वॉलिफाइंगमध्ये सहभागी होईल. जर २0१७-१८ चा आयलीग विजेता पात्र ठरण्यात अपयशी ठरला, तर त्याला महाद्वीपच्या दुसऱ्या स्तराची स्पर्धा एएफसी कपमध्ये प्रवेश मिळेल. तथापि, ही व्यवस्था अस्थायी असून, हितकारकांना त्यासाठी प्रदीर्घ योजना आखावी लागणार असल्याचे एएफसीने स्पष्ट केले.बंगळुरू एफसीसाठी हे चांगले वृत्त आहे. हा एकमेव भारतीय क्लब एएफसी चषक स्पर्धेप्रती गंभीर आहे. गतउपविजेत्या बंगळुरुने यंदा विभागीय उपांत्य फेरी गाठली होती.
आयएसएलला एएफसीची मान्यता
By admin | Published: June 29, 2017 12:47 AM