केपटाऊन : वेगवान गोलंदाज कासिगो रबाडाच्या भेदक माऱ्याच्या बळावर द. आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर गुरुवारी २८२ धावांनी विजय नोंदवित तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली. ५०७ धावांचे लक्ष्य गाठताना लंकेचा संघ चौथ्या दिवशी २२४ धावांत गारद झाला. रबाडाने ५५ धावा देत ६ गडी बाद केले.व्हर्नोन फिलँडरने ४८ धावांत तीन आणि आॅफ स्पिनर केशव महाराजने एक गडी बाद केला. लंकेने सकाळी ४ बाद १३० वरून पुढे खेळ सुरू केला. कर्णधार अँजेलो मॅथ्यूज ४९ आणि यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश चांदीमल ३० यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. उपुल थरंगा १२ , सुरंगा लकमल १० आणि लाहिरी थिरिमाने याने नऊ धावा केल्या. रंगना हेरथ ३५ धावांवर नाबाद राहिला. सामन्यात १० गडी बाद करणारा रबाडा सामन्याचा मानकरी ठरला.उभय संघात अखेरचा आणि तिसरा कसोटी सामना १२ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे खेळला जाईल. (वृत्तसंस्था)
द. आफ्रिका विजयी
By admin | Published: January 06, 2017 1:07 AM