शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

आफ्रिकेचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 3:17 AM

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवताना इंग्लंडला ३४० धावांनी लोळवले. या शानदार विजयासह आफ्रिकेने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१

नॉटिंगहॅम : दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवताना इंग्लंडला ३४० धावांनी लोळवले. या शानदार विजयासह आफ्रिकेने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पाहुण्या आफ्रिका संघाने भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान इंग्लंडला नांगी टाकण्यास प्रवृत्त केले. सामन्याच्या चौथ्याच दिवशी आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव जवळपास निश्चित केला होता. आफ्रिकेने दिलेल्या ४७४ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव केवळ १३३ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात केवळ सलामीवीर अ‍ॅलिस्टर कूक (४२) याने आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याला तोंड दिले. त्याव्यतिरिक्त मोइन अली (२७), बेन स्टोक्स (१८), जॉनी बेयरस्टो ९१६) यांनी काहीप्रमाणात झुंज देण्याचा अपयशी प्रयत्न केला. या फलंदाजांचा अपवाद वगळता इतर कोणताही फलंदाज आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीपुढे तग धरु शकला नाही. ख्रिस मॉरिस, केशव महाराज आणि वेनर्ॉन फिलेंडर यांनी भेदक व अचूक मारा करताना इंग्लंड संघाला बॅकफूटवर टाकले. यामुळे दक्षिण आफ्रिकेला सामना एकतर्फी जिंकता आला. फिलेंडर आणि महाराज यांनी प्रत्येकी ३ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिडार पाडले. तसेच मॉरिस आणि डूआने आॅलिव्हर यांनी प्रत्येकी २ बळी घेत चांगला मारा केला. तत्पुर्वी, दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावामध्ये डीन एल्गर (८०), हाशिम आमला (८७) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (६३) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ९ बाद ३४३ धावांची मजबूत मजल मारली. सामन्यात शानदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या फिलेंडरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. (वृत्तसंस्था)पहिल्या डावात १३० धावांची आघाडीनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारलेल्या आफ्रिकेने पहिल्या डावात ३३५ धावा उभारल्या होत्या. हाशिम आमला (७८), क्विंटन डीकॉक (६८) आणि फिलेंडर (५४) यांनी अर्धशतक झळकावत संघाला समाधानकारक मजल मारुन दिली होती. यानंतर इंग्लंडचा डाव २०५ धावांत संपुष्टात आणून आफ्रिकेने १३० धावांची महत्त्वपुर्ण आघाडी घेतली होती. धावफलक : द. आफ्रिका (पहिला डाव): ९६.२ षटकात सर्वबाद ३३५ धावा (हाशिम आमला ७८, क्विंटन डीकॉक ६८, वनॉन फिलेंडर ५४; अँडरसन ५/७२, स्टुअर्ट ब्रॉड ३/६४) आणि (दुसरा डाव) : १०४ षटकात ९ बाद ३४३ धावा (डीन एल्गर ८०, हाशिम आमला ८७, डू प्लेसिस ६३; मोइन अली ४/७८) वि.वि. इंग्लंड (पहिला डाव) : ५१.५ षटकात सर्वबाद २०५ धावा (जो रुट ७८, जॉनी बेयरस्टो ४५; केशव महाराज ३/२१, ख्रिस मॉरिस ३/३८) व (दुसरा डाव) : ४४.२ षटकात सर्वबाद १३३ धावा (कूक ४२; वनर्ॉन फिलेंडर ३/२४, केशव महाराज ३/४२)