ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 24 - विश्वचषकाच्या अंतिम लढती हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेल्यानंतर भारताची माजी कर्णधार मिताली राज हिने क्रिकेट कारकिर्दीतील पुढील वाटचालीबाबतचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. ही आपली शेवटची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होती. आता पुढच्या विश्वचषकात मी भारतीय संघाचा भाग नसेन असे मितालीने सामना संपल्यानंतर सांगितले.
अंतिम लढतीनंतर मिताली म्हणाली, "ही माझी शेवटची विश्वचषक स्पर्धा होती. आता पुढच्या विश्वचषकात मी भारतीय संघाचा भाग नसेन" मात्र असे असले तरी मितालीने कर्णधारपद सोडण्याबाबत वा निवृत्ती स्वीकारण्याबाबत कोणताही मोठा निर्णय घेतला नाही.
यावेळी अंतिम लढतीत झालेल्या पराभवाचे विश्लेषण करताना तिने सांगितले की, सामन्यातीत बहुतांश वेळ दोन्ही संघांना समान संधी होती. पण महत्त्वाच्या क्षणी भारतीय संघाने पाठोपाठ विकेट्स गमावल्या. त्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला." मात्र संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या आपल्या संघाचे तिने कौतुक केले.