ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - चॅम्पियन्स स्पर्धेतील कामगिरी पाहता भारत विजयश्री उंचावेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र पाकिस्तानने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. भारताच्या या पराभवामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली. सोशल मीडियावर त्यांनी आपला राग व्यक्त केला. जोक्सचा पाऊस पाडला गेला. भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंना सोशल साइट्सवर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केल्याचे दिसून येत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टिष्ट्वटरवर विराटसेनेवरील जोक्सचा पाऊस पडत आहे. भारतीयांना एक वेळ ट्रॉफी जिंकून दिली नाही तरी चालेल, परंतु पाकिस्तानसोबतची हार मान्य नाही. मग ती हार क्रिकेट, कबड्डी, हॉकीच्या मैदानात असो. याच मानसिकतेचा प्रत्यय फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर येत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान फायनलमध्ये अनेक वेळा नो बॉल टाकणाऱ्या जसप्रीत बुमराहला सर्वात जास्त ट्रोल केले जात आहे. त्याचप्रमाणे जाडेजालाही ट्रोल केलं जात आहे. जाडेजाची तुलना बाहुबलीतील कटप्पाशी केली जात आहे. हार्दिक पंड्यला वाचवण्यासाठी त्याने आपली विकेट का दिली नाही असा प्रश्न सोशल माध्यमात उठत आहे. शून्यावर बाद होणाऱ्या रोहित शर्मासह धोनीसुद्धा नेटीझन्सचे टार्गेट झाला आहे. सुरुवातीपासून उत्तम खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या विराटसेनेने अत्यंत मोक्याच्या क्षणी कच खाल्ली, दारुण पराभव स्वीकारला आणि तोही भारताच्या पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानसोबत. त्यामुळे भावनिक झालेल्या भारतीयांनी सोशल माध्यम निवडत टीम इंडियाला ट्रोल केले आहे. तर दुसऱ्या बाजूला काही समजूतदार भारतीयांनी सोशल साइट्सवर रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर असभ्य भाषेत ट्रोल करणाऱ्यांना कमेंट्सच्या माध्यमातून उत्तरे देऊन टीम इंडिया आणि त्यांच्या खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले आहे. काही निवडक जोक्स आम्ही येथे देत आहोत.
- कृपया भारताच्या कोणत्याही खेळाडुवर असभ्य भाष्य करू नये आपण भारतात राहतो पाकिस्तानात नाही शेवटी खेळ आहे
सर्व भारतीयाना भारताच्या विजयाच्या आशा होती, पण कदाचित आज आपला दिवस नव्हता, आज आपण हरलो सर्व भारतात सन्नाटा झाला असेल, अनेक भारतीय क्रिकेट प्रेमींची मन दुखावली असतील कोणाला आपल्याच खेळाडूंचा राग आला असेल ,मित्रानो आज हरलो पण या आधी ची आपल्या खेळाडूंची कामगिरी आपल्या लाडक्या भारतीय संघाची कामगिरी विसरू नका... आज हरलो म्हणून कुठे फालतू जोक कमेंट करू नका उलट आपल्या टीम ला सपोर्ट करूयात त्यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहुयात, आज जेवढं दुःख , वाईट आपल्याला वाटत असेल तेवढंच आपल्या खेळाडूंना पण वाटत असेल, आत्ता या क्षणी त्यांच्या मनाची अवस्था एक भारतीय म्हणून आपणच समजू शकतो, या नंतर कधी पाकिस्तान आपल्या समोर येणार नाही का???? येणारच 100% येणार तेव्हा,
एक जित से कोई सिकंदर नहीं बनता और एक हार से कोई फकीर नहीं बनता
आपली टीम इंडिया परत एकदा नव्या जोमाने मैदानात उतरेल एवढा विश्वास प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे.
गल्लीत खेळताना आऊट झाल्यावर बॅट घरी घेऊन जाणाऱ्यांनी भारतीय टीमबद्दल आपलं मत व्यक्त करू नये...! आत्तापर्यंत खूप सुंदर परफॉर्मन्स दिलाय.आज आपला दिवस नव्हता.हा खेळ आहे...!
कित्येक वेळा आपली मनं जिंकणारा हाच भारतीय संघ...! सोशल मिडिया वर उगाच आपल्या टीमचे वाभाडे काडू नयेत...!
पुतळे...फोटो जाळणे...अपशब्द वापरणे ही आपली संस्कृती नाही...!!
आणि उगाच "पैसे खाल्ले" "मॅच फिक्स होती" असं म्हंणर्यांचा धिक्कार असो
--------------
कदाचित भारतीय क्रिकेट टीम जर कदाचित हरली तर कोणीही वाईट पोस्ट टाकू नये ही विनंती.
आपणच आपल्यावर चिखल उडवू नये, आपल्या देशाचा सन्मान ठेवा.
आजुन ही चान्स आहें जिंकवून देतो...
मला राष्ट्रपती करा.... - शरद पवार
Breaking news
जडेजा बाथरूम मध्ये बंद
पंड्या बॅट घेऊन बाहेर ऊभा
एक ना एक दिवशी
आफ्रिदीच्या आईचा तळतळाट लागणारच होता
BCCI चा नवीन आदेश
पांड्या फक्त विमानाने येणार
बाकीचे रेल्वे ने
आणि बुमरा ST ने
पण
जडेजा चालत
हमें अपनो ने लूटा गैरो में कहा दम था,
हमारा पैर वहा गिरा जहा चुना कम था- बुमराह
प्रत्येक बापाची एकच इच्छा असते
आपला मुलगा जिंकला पाहिजे...
आज फादर डे आहे...
मुलांच्या आनंदासाठी आज बाप जरी मॅच हारला तरी कुणी वाईट वाटून घेऊ नये
पंडया तो बाहुबली था
लेकिन जडेजा कटप्पा निकला