नवी दिल्ली : भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालला बीडब्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. सायनाचा हा पराभव तिचा पती पारुपल्ली कश्यपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळाले. या पराभवानंतर कश्यप चांगलाच भडकला आणि त्याने एक असे कृत्य केले की, त्याने ते करायला नको होते.
सायनाला डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टकडून पराभव पत्करावा लागला. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेल्या सायनाला एक तास 12 मिनिटे चाललेल्या सामन्यात 15-21, 27-25, 21-12 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर कश्यप चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. पण त्याचे रागावण्याचे कारण नेमके होते तरी काय...
सायनाचा पराभव झाल्यावर कश्यप पंचांवर भडकलेला पाहायला मिळाला. सायनाच्या पराभवाला सदोष पंचगिरी कारणीभूत असल्याचे त्याने ट्विटरवर म्हटले आहे. आपल्या पोस्टमध्ये कश्यप म्हणाला की, " सदोष पंचगिरीचा फटका सायनाला या सामन्यात बसला. पंचांच्या वाईट कामगिरीमुळे सायनाकडून दोन मॅच पॉइंट्स हिरावले गेले. त्याचबरोबर पंचांकडून बरेच वाईट निर्णय पाहायला मिळाले."