शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

GST नंतर Live क्रिकेट सामने पाहणे महागणार

By admin | Published: June 30, 2017 12:15 PM

जीएसटी लागू झाल्यानंतर काही ठिकाणी तुमचे पैसे वाचतील तर, काही ठिकाणी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 30 - जीएसटी लागू झाल्यानंतर काही ठिकाणी तुमचे पैसे वाचतील तर, काही ठिकाणी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. उदहारणार्थ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर तुमचे पैसे वाचतील तर,  चैन  करताना तुमचा खिसा जास्त रिकामा होईल. चैनीच्या गोष्टीमध्ये आयपीएलचा समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट आणि मनोरंजनाचा तडका असलेले आयपीएल भारतात लोकप्रिय असून, जीएसटी लागू झाल्यानंतर स्टेडियमवर जाऊन आयपीएलचे सामने पाहणे महागणार आहे. 
 
आयपीएलच्या एका तिकिटावर 28 टक्के कर भरावा लागेल. मान्यताप्राप्त क्रीडा संघटना उदहारणार्थ क्रिकेट, हॉकी सामन्यांच्या तिकिटावर 18 टक्के कर द्यावा लागेल. 250 रुपयांच्या आत असलेल्या तिकिटावर जीएसटी लागू होणार नाही. पण प्रत्येक स्टेडियममध्ये या दरात मर्यादीत तिकिटे उपलब्ध असतात. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना यापुढे जास्त पैसे मोजावे लागतील. आधी मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांच्या सर्व क्रीडा सामन्यांवर सरसकट 28 टक्के जीएसटी आकारण्याचे ठरले होते. 
 
आणखी वाचा 
 
पण गुरुवारी झालेल्या बैठकीत हा कर 10 टक्क्यांनी कमी करुन 18 टक्के करण्याता आला. यापूर्वी आयपीएलच्या तिकिटावर सेवा आणि मनोरंजन कर आकारला जात होता. पण आता सर्वच प्रकारच्या क्रीडा सामन्यांमध्ये प्रत्येक तिकिटावर 18 टक्के जीएसटी आकारला जाईल. क्रीडाप्रेमींसाठी हा एक धक्का आहे. 
 
30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटीच्या रुपाने देशात एक नवी कररचना लागू होईल. स्वातंत्र्यानंतरची ही देशातील सर्वात मोठी कर सुधारणा असल्याचे बोलले जात आहे. जीएसटीचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होणार असून, वर्षभराच्या अंमलबजावणीनंतरच जीएसटीचे नेमके मुल्यांकन शक्य आहे. व्यापारी, ग्राहक, किंमती आणि सरकारी महसूल सर्वांवरच याचा परिणाम होणार आहे. 
 
जीएसटीसाठीच्या संसदेच्या विशेष अधिवेशनावर काँग्रेसचा बहिष्कार
देशातील करप्रणालीत क्रांतिकारी बदल करणाऱ्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या अंमलबजावणीला ऐतिहासिक बनवण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसने जीएसटीच्या उदघाटनासाठी  शुक्रवारी मध्यरात्री बोलावण्यात आलेल्या संसदेच्या विशेष संयुक्त अधिवेशनात सहभागी न होण्याचा  निर्णय घेतला आहे.