नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर होणाºया टीकेमुळे एक वेळ हा खेळ सोडण्याचा आपण विचार करीत होतो, असे विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणा-या सैखोम मीराबाई चानू हिने सांगितले.विश्व चॅम्पियनशिपमध्ये कर्णम मल्लेश्वरीनंतर सुवर्णपदक जिंकणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरलेली चानू म्हणाली की, ‘आॅलिम्पिकनंतर वास्तवत: मी खूप हताश झाली होती. या निराशेतून सावरण्यास मला खूप वेळ लागला. एवढेच नव्हे तर हा खेळ सोडण्याचा आणि सराव न करण्याविषयी विचार करीत होते. सोशल मीडियावर होणाºया मत आणि माझ्या प्रशिक्षकांवरील टीकेमुळे मला वाईट वाटत होते. परिस्थिती कशी अनुकूल होईल याचा मी दिवसरात्र विचार करीत होते. मी नंतर पहिल्यापेक्षा चांगले करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यामुळेच मी टीकाकारांचे तोंड बोंद करू शकत होते. याच विचाराने मी सावरू शकत होते.’मणीपूरच्या या २३ वर्षीय खेळाडूने गेल्या महिन्यात अमेरिकेच्या अनाहीम येथे २२ वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. तिने १९४ किलो (स्नॅचमध्ये ८५ आणि क्लीन व जर्कमध्ये १०९ किलो) उचलताना नवीन विश्वविक्रमही रचला होता. आपले कौशल्यावर काम केले आणि रिओतून सावरण्यासाठी मनोचिकित्सकाची मदत घेतल्याचे चानू सांगते. ती म्हणाली की, ‘मी आॅलिम्पिकमध्ये खराब कामगिरी केली. मी क्लीन आणि जर्कमध्ये अपयशी ठरले. मी माझ्या प्रशिक्षकांशी याविषयी चर्चा केली आणि सरावादरम्यान आपल्या कौशल्यात बदल केले. मनोचिकित्सकनेदेखील मोठी भूमिका बजावली. मी आॅलिम्पिकनंतर प्रत्येक महिन्यात दोनदा मनोचिकित्सकांकडे जात होते आणि त्यामुळे मला खरंच मदत झाली. विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न आता साकार केले आहे.’
रिओतील अपयशानंतर निवृत्तीचा विचार होता - चानू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 3:47 AM