कोलंबो : आॅगस्ट महिन्यात भारताविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्त होण्याची घोषणा श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारा याने शनिवारी केली. पाकविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत खेळ संपल्यानंतर ३७ वर्षांचा संगकारा म्हणाला, आता माझी निवृत्त होण्याची वेळ आली आहे. आॅगस्ट महिन्यात भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी लंका दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत खेळल्यानंतर मी निवृत्त होणार आहे.पाकविरुद्ध पाल्लिकल येथे ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत आपण खेळणार नसल्याचेही संगकाराने जाहीर केले. तो पुढे म्हणाला, मी विश्वचषकानंतर निवृत्त होणार होतो; पण निवडकर्त्यांनी खेळण्याचा आग्रह केला. त्यामुळे आणखी चार कसोटी सामने खेळण्यास मी तयार झालो. संगकाराने कसोटीत सर्वाधिक १२,३०५ धावा केल्या असून त्यात ३८ शतके आहेत. (वृत्तसंस्था)