शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

पुन्हा "जिंक्स" फॅक्टर आणि मुंबईचा भेदक मारा

By admin | Published: May 22, 2017 2:21 AM

आयपीएल १० चे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले. आयपीएलमध्ये तीन वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम मुंबईने केला

आकाश नेवे/ आॅनलाईन लोकमत

हैदराबाद , दि. 22 - आयपीएल १० चे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले. आयपीएलमध्ये तीन वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम मुंबईने केला. अंतिम लढतीत मुंबईला पुन्हा एकदा जिंक्स फॅक्टर म्हणजेच अजिंक्य रहाणेचा सामना करावा लागला.बुमराह, मलिंगा, जॉन्सन या तिकडीने अचूक आणि भेदक गोलंदाजीने हा सामना मुंबईच्या बाजूने फिरवला. आयपीएल १० मध्ये मुंबई इंडियन्सच्या पुणे संघाविरोधातील विजयाचा मोठा अडसर ठरला होता तो जिंक्स म्हणजेच अजिंक्य रहाणे. रहाणेने मुंबई विरुद्ध पुणे या सामन्यात नेहमीच मोठी धावसंख्या उभारली होती. फायनलमध्येही तो मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. मात्र संघाच्या धावगतीने अखेरच्या क्षणात पुण्याचा एका धावेने घात झाला. पुण्याचा विजयासाठी एक धाव उणी पडली. हैदराबादच्या उप्पल स्टेडिअमची संथ खेळपट्टी पाहता मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या गोलंदाजांना अफलातून मारा करताना मुंबईला अडचणीत आणले. मुंबई शंभरीही पार करेल का प्रश्न निर्माण झाला. मात्र संघाचे संतुलन ठेवणारा अष्टपैलु कृणाल पांड्याने याने ४७ धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे मुंबईने १२९ धावा केल्या. आयपीएलच्या अंतिम फेरीतील ही सर्वात कमी धावसंख्या होती. पुण्याची सुरूवातही दमदार झाली. साखळी फेरीत आणि क्वालिफायर १ च्यासामन्यात मुंबईसमोर उभा ठाकणाऱ्या अंजिक्य रहाणे याने स्मिथच्या साथीने ५४ धावांची भागिदारी केली. रहाणेला चौथ्याच षटकांत जीवदान मिळाले होते.त्याचा त्याने फायदा घेतला. मात्र दुसऱ्या बाजुने स्मिथ संथ खेळत होता. नंतर स्मिथने धावांचा वेग वाढवला पण तो पर्यंत बहुदा वेळ निघून गेली होती. यॉर्करमॅन बुमराह आणि मलिंगा यांनी डेथ ओव्हर्समध्ये केलेल्या अचुक माऱ्याच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत सामना खेचला. अखेरच्या षटकांत पुण्याला विजयासाठी ११ धावा हव्या होत्या. त्यातच मनोज तिवारीने पहिल्या चेंडूवर चौकार खेचला. मात्र मिशेल जॉन्सन याने पुण्याच्या फलंदाजांना अनुभव काय असतो हे दाखवून दिले. मुंबईचा विक्रमी विजय मुंबईने तीन वेळेस या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. या आधी मुंबईने २०१३ आणि २०१५ मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यासोबतच केकेआर आणि सीएसकेने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. आॅरेंज कॅप - सनराजयर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल यांनी दोन वेळा आॅरेंज कॅप पटकावली आहे. वॉर्नरने २०१५ आणि २०१७ मध्ये तर गेल याने २०११ आणि २०१२ मध्ये आॅरेंजकॅप पटकावली होती.पर्पल कॅप - ब्राव्हो याने २०१३ आणि २०१५ मध्ये तर भुवनेश्वर कुमार याने २०१६ आणि २०१७ मध्ये पर्पल कॅप दोन वेळा पटकावलीएकाच संघातील खेळाडूंनी आॅरेंज कॅप आणि पर्पल कॅप पटकावण्याचा विक्रम या सत्रात झाला आहे. हैदराबादच्या वॉर्नर आणि भुवनेश्वर कुमार यांनी ही कामगिरी केली तर या आधी २०१३ मध्ये सीएसकेच्या माईक हसी आणि ब्राव्होयांनी ही कामगिरी केली होती.महेंद्र सिंह धोनी या हा आयपीएल अंतिम लढतीतील सलग चौथा पराभव आहे. त्याने याआधी सीएसकेकडून २०११ च्या विजेतेपदानंतर २०१२,२०१३,२०१५ अंतिम फेरी गाठली होती. त्यात पराभूत व्हावे लागले. तर यंदा त्याने पुणे संघाकडून अंतिम फेरी गाठली मात्र आताही पराभवच पदरी पडला. धोनीने आयपीएलच्या सात अंतिम लढती खेळल्या त्यातील पाच अंतिम लढतीत पराभव स्विकारला आहे. त्या खालोखाल सुरेश रैना चार अंतिम लढतीत पराभव पत्करावालागला.