नवी दिल्ली : माझी आक्रमक खेळ करण्याची शैलीच मला पुढील सत्रात फायदेशीर ठरेल, असे मत भारताचा बॅडमिंटन खेळाडू एच. एस. प्रणय याने व्यक्त केले. ‘पीबीएस’च्या दुसऱ्या सत्रात सर्वच्या सर्व सात लढती त्याने जिंकल्या आहे. आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये देखील हाच फॉर्म कायम राखण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले.प्रणयचा संघ मुंबई रॅकेट्सला चेन्नई स्मॅशर्सकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रणय म्हणाला की, ‘‘मी कोर्टवर माझ्या दृष्टिकोनात बदल करण्याच्या प्रयत्नात होतो. गेल्या काही वर्षांत मला वाटत होते की, मी स्वत:वर जास्तच नियंत्रण ठेवत होतो. मात्र, येथे मी आक्रमकपणे खेळलो आणि मला वाटते की, याचा मला पुढच्या सत्रात फायदा होईल. सातही सामने जिंकल्याने मला खूप फायदा झाला. मी चांगल्या फॉर्ममध्ये आहे.’’ गेल्यावर्षी गुडघ्याला दुखापत झाल्याने कश्यपचे आॅलिम्पिकचे स्वप्न भंगले होते.
आक्रमकताच फायदेशीर ठरेल
By admin | Published: January 16, 2017 5:30 AM