अहमदाबाद: महाराष्ट्राचा शेजारी असलेला गुजरात २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठीची तयारी गुजरात सरकारनं सुरू केली आहे. २०३२ मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा नेमकी कुठे होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र गुजरातनं २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकच्या यजमानपदाची तयारी सुरू केली आहे. अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये यासाठी सोयी सुविधा उभारल्या जाणार आहेत.तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतील; पंतप्रधानांनी घेतला ऑलिम्पिक तयारीचा आढावाअहमदाबाद शहर विकास प्राधिकरणानं (औडा) मंगळवारी क्रीडा आणि क्रीडा व्यतिरिक्त सुविधा उभारण्यासाठी निविदा काढल्या. हे काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कंत्राटदारांना ऑलिम्पिक निकषांनुसार काम करावं लागणार आहे. काम मिळणाऱ्या एजन्सीला पुढील तीन महिन्यांत अहवाल तयार करावा लागेल. ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पायाभूत सोयीसुविधा उभाराव्या लागतात. त्याची तयारी गुजरातनं आतापासूनच सुरू केली आहे.ऑलिम्पिकच्या सुरक्षित आयोजनासाठी जपानने वाढविला ‘लॉकडाऊन’२०२८ पर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ते निश्चित झालेलं आहे. २०२० मध्ये टोकियोत ऑलिम्पिकचं आयोजन होणार होतं. मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलण्यात आलं. ही स्पर्धा आता २०२१ मध्ये होईल. २०२४ ची ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये, तर २०२८ ची स्पर्धा लॉज एँजेलिसमध्ये भरवली जाईल. २०२८ मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये स्पर्धा खेळवली जाऊ शकते. मात्र याबद्दल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं अद्याप तरी निर्णय घेतलेला नाही.टोकियो ऑलिम्पिकचं आयोजन २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान टोकियोत होणार आहे. तर पॅरालिम्पिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान संपन्न होईल. टोकियो ऑलिम्पिकचं आयोजन गेल्या वर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं होतं. मात्र कोरोनामुळे ते एक वर्ष पुढे ढकलण्यात आलं. आतापर्यंत एकूण २३ ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या असून त्यातील १७ मध्ये भारतानं सहभाग घेतला आहे.
२०३६ मध्ये गुजरातमध्ये रंगणार महासोहळा?; महाराष्ट्राचा शेजारी मोठी उडी मारण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 4:36 PM