नवी दिल्ली : हॉलंडच्या राष्ट्रीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक पाल वान एम्स आणि न्यूझीलंडचे अॅथनी थोर्नटन यांची अनुक्रमे भारतीय हॉकी संघाच्या पुरुष व महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) शुक्रवारी ही घोषणा केली आहे. साईकडून सांगण्यात आले की, क्रीडा सचिव आणि साईचे महासंचालक अजित शरण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा, रोलॅँट ओल्टमॅन्स, आॅलिम्पियन हरविंदर सिंह आणि साईचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी तीन नामांकने आली होती. त्यात हॉलंडच्या वान एम्स आणि हेंस स्ट्रीडर तसेच आॅस्ट्रेलियाचे अलेक्झॅँडर ग्रे यांचा तर महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी थोर्नटन, कॅनडाचे मथायस एहरेन्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या फॅबियन ग्रेगरी यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)
एम्स, थोर्नटन हॉकीचे प्रशिक्षक
By admin | Published: January 31, 2015 3:12 AM