शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

अजित चंदिलावर आजीवन बंदी

By admin | Published: January 19, 2016 3:28 AM

आयपीएलच्या सहाव्या पर्वातील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभागी झालेला राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू अजित चंदिलावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तीन सदस्यांच्या

मुंबई : आयपीएलच्या सहाव्या पर्वातील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभागी झालेला राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू अजित चंदिलावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तीन सदस्यांच्या शिस्तपालन समितीने सोमवारी आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला, तर मुंबईच्या हिकेन शाहवर पाच वर्षांची बंदी घातली. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या शिस्तपालन समितीने हा निर्णय घेतला. २०१३ मध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चंदिला दोषी आढळला होता. त्या वेळी त्याला या प्रकरणात अटकही झाली होती. राजस्थान रॉयल्सचे अन्य खेळाडू शांताकुमारन श्रीसंत आणि अंकित चव्हाण यांनाही या प्रकरणात अटक झाली होती. याव्यतिरिक्त बीसीसीआयने मुंबईच्या हिकेन शाहला पाच वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. शाहवर त्याच्या प्रथम श्रेणी संघातील सहकारी खेळाडूसोबत फिक्सिंगसाठी संपर्क केल्याचा आरोप आहे. ज्या खेळाडूसोबत शाह याने संपर्क केला होता, तो खेळाडू आयपीएलमध्ये खेळतो. या खेळाडूने याबाबतची तक्रार आपल्या फ्रॅन्चायझीला केली होती. बीसीसीआयने त्यानंतर त्याची माहिती गुन्हे शाखेला दिली होती. बीसीसीआयने म्हटले आहे, ‘‘अजित चंदिला विविध कलमांखाली दोषी आढळला. त्यामुळे त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात येत आहे. या कालावधीत त्याला बीसीसीआय व बीसीसीआयसोबत संलग्न असलेल्या कुठल्याही संघटनेसोबत क्रिकेटच्या कुठल्याही स्वरूपात जुळता येणार नाही.’’बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने मुंबई येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीत चंदिला व हिकेन यांच्याबाबत निर्णय घेतला. याव्यतिरिक्त २०१३ च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी असलेले पाकिस्तानचे माजी पंच असद रौफ यांच्याबाबतही बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला. रौफ यांनी बोर्डाच्या कारवाईमध्ये पारदर्शीता नसल्याचा आरोप करताना दुसऱ्या चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. माजी अम्पायर येथे बोर्डापुढे बैठकीमध्ये वैयक्तिकरीत्या उपस्थित नव्हते, पण त्यांनी लेखी स्वरुपात बोर्डापुढे अपील केले. शिस्तपालन समितीने हे अपील फेटाळून लावले. बोर्डाचे अध्यक्ष मनोहर, ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शाह यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यांच्या समितीने माजी पाकिस्तानी पंचाविरुद्धचा निर्णय १२ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. रौफला लिखित उत्तर देण्यासाठी ९ फेब्रुवारीची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. यापूर्वी चंदिला आणि शाह या प्रकरणात समितीपुढे डिसेंबर २०१५ ला स्वत: उपस्थित होते आणि बोर्डाने त्यांना लिखित उत्तर देण्यासाठी ४ जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर समितीने ५ जानेवारी रोजी बैठक घेतली आणि त्यात हिकेनने समितीपुढे उपस्थिती नोंदवताना आपले लेखी व तोंडी उत्तर दिले होते. भारतीय बोर्डामध्ये पारदर्शीता आणण्यासाठी आणि बोर्डाची प्रतिमा सुधारण्याबाबत अध्यक्ष मनोहर गंभीर आहेत. याबाबत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात राजस्थानचा माजी क्रिकेटपटू चंदिलावर आजीवन बंदीचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आयपीएलच्या सहाव्या पर्वातील भ्रष्टाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या जस्टिस लोढा समितीने राजस्थान रॉयल्स फ्रॅन्चायझीला गेल्या वर्षी स्पर्धेतून दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे. (वृत्तसंस्था)रौफ वैयक्तिक उपस्थित झाले नाही आणि त्यांनी बोर्डाची सुनावणी योग्य पद्धतीने झाली नसल्याचे लिखित उत्तरात म्हटले असून चौकशीसाठी अन्य अधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. बोर्डाने रौफ यांचे अपील फेटाळून लावले. बोर्डाने रौफ यांना उत्तर देण्यासाठी आणि पुरावे सादर करण्यासाठी ९ फेब्रुवारी ही अंतिम मुदत दिली आहे. ही या प्रकरणाची अखेरची तारीख राहणार असून याबाबतचा निर्णय १२ फेब्रुवारी रोजी होईल.- अनुराग ठाकूर