बर्मिंघम : गत विश्व चॅम्पियन पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यफेरीत पराभव स्वीकारावा लागला. शनिवारी महिला एकेरीत थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगविरुद्ध तिला पराभवाला सामोरे जावे लागले. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला तिच्यापेक्षा युवा व जागतिक क्रमवारीत ११ व्या क्रमांकाची खेळाडू चोचुवोंगच्या चपळ व अचुकतेची बरोबरी साधता आली नाही. ४३ मिनिटे रंगलेल्या या लढतीत सिंधूला १७-२१, ९-२१ने पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिंधूला २०१८ ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्येही उपांत्यफेरीत पराभव स्वीकारावा लागला होता.
सिंधूचा उपांत्य लढतीपूर्वी २३ वर्षीय चोचुवोंगविरुद्ध विजयाचा रेकॉर्ड ४-१ असा होता. तिला तिने जानेवारीमध्ये एचएसबीसी बीडब्ल्यूएफ टूर फायनल्समध्ये पराभूत केले होते. पण, चोचुवोंगच्या शानदार बचावापुढे या आकडेवारीला अर्थ उरला नाही. त्याआधी, शुक्रवारी रात्री पाचव्या मानांकित सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तिसऱ्या मानांकित अकाने यामागुचीचा १६-२१, २१-१६, २१-१९ने पराभव करत उपांत्यफेरी गाठली होती.
पाचव्या मानांकित सिंधूने पहिला गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करताना १६-२१, २१-१६, २१-१९ने विजय नोंदवला. एक तास १६ मिनिटे रंगलेल्या लढतीत विजय मिळवत सिंधूने दुसऱ्यांदा या स्पर्धेत उपांत्यफेरीत प्रवेश केला. यापूर्वी यामागुचीविरुद्ध सिंधूची कारकिर्दीतील कामगिरी १०-७ अशी होती, पण गेल्या तीन लढतींमध्ये तिला पराभव स्वीकारावा लागला होता. स्वीस ओपन फायनलमध्ये खेळणाऱ्या सिंधूने आक्रमक खेळ केला, पण पहिल्या गेममध्ये टाळण्याजोग्या चुकांचे मोल द्यावे लागले. यामागुचीने १७-११ आघाडी घेतली होती, पण सिंधूने पुनरागमन करताना अंतर १५-१८ असे केले. त्यानंतर यामागुचीने सलग गुण वसूल करत पहिला गेम जिंकला.दुसऱ्या गेममध्ये उभय खेळाडूंनी सुरुवातीला चुका केला. सिंधूने ६-२ अशी आघाडी घेतली त्यानंतर ८-४ अशी केली.
माझ्या मते आजचा दिवस तिचा होता. ती जो फटका मारत होती तो लाईनवर जात होता. मला काही करता आले नाही. मला चुकांवर नियंत्रण राखायला हवे होते, तर काही वेगळे घडले असते.ही चांगली लढत होईल, याची कल्पना होती. तिच्याकडे चांगले फटके आहेत.
तिसऱ्या गेममध्ये मी नियंत्रण कायम राखले आणि प्रशिक्षकांचेही सहकार्य लाभले. प्रत्येक गुण महत्त्वाचा होता कारण कुणीही जिंकू शकत होता. मी विजयी ठरल्यामुळे आनंद झाला.’‘मी प्रदीर्घ कालावधीनंतर तिच्याविरुद्ध खेळत होती. कदाचित २०१९ मध्ये अखेरची लढत खेळली होती. तिनेही बरीच मेहनत घेतली होती आणि ही लढत चांगली झाली. पहिल्या गेममध्ये मी अनेक चुका केल्या, पण दुसऱ्या गेममध्ये सावरले. सामन्यांत अनेक रॅली झाल्या आणि दुसरा गेम जिंकणे आवश्यक होते. तिसऱ्या गेममध्ये मी नियंत्रण कायम राखले आणि प्रशिक्षकांचेही सहकार्य लाभले. प्रत्येक गुण महत्त्वाचा होता कारण कुणीही जिंकू शकत होता. मी विजयी ठरल्यामुळे आनंद झाला.’ - पी. व्ही. सिंधू