शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

सर्वांचे लक्ष साक्षीच्या कामगिरीकडे

By admin | Published: May 10, 2017 12:57 AM

रिओ आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहे. योगेश्वर दत्त, सुशील कुमार आणि फोगाट भगिनी गीता व बबिता यांच्या अनुपस्थितीत साक्षी, आॅलिम्पियन संदीप तोमर आणि बजरंग पूनिया भारताची कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्नशील असतील. गेल्या वर्षी थायलंडच्या बँकॉकमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, तीन रौप्य व पाच कांस्य पदकांसह एकूण ९ पदके पटकावली होती. बँकॉकमध्ये संदीप (पुरुष ७५ किलो फ्रीस्टाईल) भारतीय मल्लांमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. भारतीय मल्लांसाठी यंदाच्या मोसमातील ही पहिली प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. भारताने २८ सदस्यांचा समावेश असलेले पथक यासाठी निवडले आहे. त्यात फ्रीस्टाईल, महिला व ग्रीकोरोमन गटात प्रत्येकी ८ मल्लांचा समावेश आहे. स्पर्धेत फ्रीस्टाईलमध्ये ११२, ग्रीकोरोमनमध्ये १०३ आणि महिला विभागात ८३ मल्ल सहभागी होत आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने २४ सुवर्ण, २४ रौप्य व ४८ कांस्यपदकांचा निकाल लागणार आहे. भारताव्यतिरिक्त इराण, उज्बेकिस्तान, कझाखस्तान, किर्गिस्तान, जपान, कोरिया, चीन व मंगोलिया या देशांतील आघाडीचे मल्ल केडी जाधव कुस्ती परिसरात आयोजित या पाच दिवसीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. भारतीय चाहत्यांची नजर साक्षीच्या कामगिरीवर केंद्रित झाली आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला मल्ल ठरणाऱ्या साक्षीने आॅलिम्पिकनंतर यंदा केवळ व्यावसायिक कुस्ती लगीमध्ये काही लढतींमध्ये सहभाग नोंदवला होता. साक्षीने लखनौमध्ये आयोजित चाचणी स्पर्धेत तांत्रिक आधारावर मंजूचा १०-० ने पराभव केला होता. या व्यतिरिक्त फोगाट भगिनी विनेश व रितू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती विनेश रिओ आॅलिम्पिकदरम्यान दुखापतग्रस्त झाली होती. ती या स्पर्धेच्या निमित्ताने पुनरागमन करीत आहे. विनेशने यापूर्वीच्या स्पर्धेत ५३ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले होते, पण रितूचे थोड्या फरकाने पदक हुकले होते. यावेळी त्या अपयशाची भरपाई करण्यास रितू उत्सुक आहे. पुरुष फ्रीस्टाईलमध्ये भारताला संदीप व बजरंग (६५ किलो) यांच्याकडून पदकाची आशा आहे. जितेंदरपुढे (७५ किलो) दोनदा आॅलिम्पिक पदकाचा मानकरी ठरलेला सुशील कुमार व निलंबित मल्ल नरसिंग यादव यांच्या दडपणातून बाहेर पडण्याची संधी आहे. साक्षीचे पती सत्यव्रत कादियान (९७ किलो) यांच्या कामगिरीवरही सर्वांची नजर राहणार आहे. ग्रीको रोमन भारताची मजबूत बाजू नाही, पण मायदेशात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारतीय मल्ल प्रतिस्पर्ध्यांना चकित करू शकतात. कतार व थायलंड येथे आयोजित गेल्या दोन स्पर्धांमध्ये इराणने फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन प्रकारात वर्चस्व गाजवले होते. भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांना यजमान मल्लांकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. (वृत्तसंस्था)भारतीय पथक-पुरुष फ्रीस्टाईल :- संदीप तोमर (५७ किलो), हरफुल (६१ किलो), बजरंग (६५ किलो), विनोद (७० किलो), जितेंदर (७४ किलो), सोमवीर (८६ किलो), सत्यव्रत कादियान (९७ किलो) आणि सुमित (१२५ किलो). ग्रीको रोमन :- ज्ञानेंदर (५९ किलो), दीपक (७१ किलो), गुरप्रीत (७५ किलो), हरप्रीत (८० किलो), अनिल कुमार (८५ किलो), हरदीप (९८ किलो) आणि नवीन (१३० किलो). महिला :- रितू (४८ किलो), पिंकी (५३ किलो), विनेश (५५ किलो), साक्षी मलिक (५८ किलो), सरिता (६० किलो), रितू (६५ किलो), दिव्या ककरान (६९ किलो) आणि ज्योती (७५ किलो).