शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

चारही लढती एकतर्फीच

By admin | Published: March 23, 2015 1:41 AM

विश्वकप क्रिकेट स्पर्धेत जगातील सर्वोत्तम आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यामुळे बाद फेरीच्या सामन्यांमध्ये चुरस बघायला मिळेल,

नवी दिल्ली : विश्वकप क्रिकेट स्पर्धेत जगातील सर्वोत्तम आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यामुळे बाद फेरीच्या सामन्यांमध्ये चुरस बघायला मिळेल, अशी आशा होती. पण उपांत्यपूर्व फेरीचे सर्व सामने एकतर्फीच झाल्यामुळे चाहत्यांसह अनेक माजी क्रिकेटपटूंनी निराशा व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिका संघाने सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात श्रीलंकेचा ९ गडी राखून पराभव केला; तर गत चॅम्पियन भारतीय संघाने मेलबोर्नमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेशवर १०९ धावांनी विजय मिळविला. अ‍ॅडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात यजमान आॅस्ट्रेलियाने पाकिस्तानचे आव्हान ६ गडी राखून मोडून काढले, तर सहयजमान न्यूझीलंडने चौथ्या व अखेरच्या उपांत्यपूर्व सामन्यात वेस्ट इंडिजचा १४३ धावांनी धुव्वा उडविला. न्यूझीलंडने वेलिंग्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दिमाखदार विजय मिळविल्यानंतर सामन्याचे समालोचन करणारा भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने यावेळी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सर्व सामने एकतर्फी झाल्याची कबुली दिली. केवळ आॅस्ट्रेलिया व पाकिस्तान संघांदरम्यानच्या लढतीत थोडा संघर्ष अनुभवण्यास मिळाला. २०१५ च्या विश्वकप स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींचा २०११ च्या स्पर्धेतील लढतींसोबत तुलना केली तर, गेल्या विश्वकप स्पर्धेत दोन उपांत्यपूर्व फेरीचे सामने एकतर्फी ठरले होते. दोन सामन्यांमध्ये चुरस अनुभवण्यास मिळाली होती. उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिका संघाने दोनदा उपविजेत्या ठरलेल्या श्रीलंका संघाचा डाव ३७.२ षटकांत १३३ धावांत गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा १८ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. मेलबोर्नमध्ये भारताने ६ बाद ३०२ धावांची मजल मारल्यानंतर, प्रत्युत्तरात खेळणाऱ्या बांगलादेश संघाचा डाव ४५ षटकांत १९३ धावांत गुंडाळला. उपांत्यपूर्व फेरीच्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकांत ८ बाद २२१ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचा डाव ४३.२ षटकांत १७२ धावांत गुंडाळला. उपांत्यपूर्व फेरीची चौथी लढत एकतर्फी झाली. श्रीलंकेने इंग्लंडचा डाव ६ बाद २२९ धावांत रोखला या धावा ३९.३ षटकांत गडी न गमावता पूर्ण केल्या.यावेळी उपांत्यपूर्व फेरीचे सामने एकतर्फी ठरले असले तरी, या लढतींमध्ये अनेक खेळाडूंनी संघातर्फे संस्मरणीय खेळी केली. दक्षिण आफ्रिका संघाचा कामचलाऊ फिरकीपटू जेपी ड्युमिनीने हॅट््ट्रिक नोंदवली. याच लढतीत लेग स्पिनर इम्रान ताहिरने चार बळी घेत सामनावीर पुरस्काराचा मान मिळविला. भारतातर्फे रोहित शर्माने बांगला देशविरुद्धच्या लढतीत १३७ धावांची खेळी केली. आॅस्ट्रेलियातर्फे जोश हेजलवूडने चार बळी घेतले, तर स्टिव्हन स्मिथ (६५) व शेन वॉटसन (नाबाद ६४) यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावली. (वृत्तसंस्था)न्यूझीलंडतर्फे सलामीवीर मार्टिन गुप्तिलने नाबाद द्विशतकी खेळी केली. गुप्तिलने १६३ चेंडूंना सामोरे जाताना २४ चौकार व ११ षटकारांच्या साह्याने नाबाद २३७ धावा फटकावल्या. विश्वकप स्पर्धेत ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली, तर वन-डे क्रिकेट इतिहासात दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. ४आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत पाकिस्तानचा डाव ४९.५ षटकांत २१३ धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलियाने विजयासाठी आवश्यक धावा ३३.५ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत न्यूझीलंडने ६ बाद ३९३ धावांची दमदार मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या कॅरेबियन संघाचा डाव ३०.३ षटकांत २५० धावांत गुंडाळला. ४२०११च्या विश्वकप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा १० गडी राखून पराभव केला होता. विंडीजचा डाव ४३.३ षटकांत ११२ धावांत गुंडाळल्यानंतर पाकिस्तानने विजयासाठी आवश्यक धावा गडी न गमावता पूर्ण केल्या. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान संघर्षपूर्ण खेळ बघण्याची संधी मिळाली. आॅस्ट्रेलियाने ६ बाद २६० धावांची मजल मारली. भारताने विजयासाठी आवश्यक धावा ४७.४ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या.