बंगळूरुचा केकेआरवर ३ गडी व ६ चेंडू राखून रोमहर्षक विजयकोलकाता : केकेकआरने उभारलेले १७७ धावांचे तगडे ‘चॅलेंज’ बंगळूरुने लिलया पेलले. या रोमाचंक सामन्यात चमकला तो ख्रिस गेल. त्याच्या धुव्वाधार ९६ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने ३ गडी आणि ६ चेंडू राखत विजय मिळवला. गेलने अवघ्या ५६ चेंडूंत ७ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करीत ९६ धावा कुटल्या. त्याच्या ह्याच धावा केकेआरसाठी निराशाजनक ठरल्या. डिव्हिलियर्सच्या १३ चेंडूंत २८ धावा सुद्धा महत्वपूर्ण ठरल्या. इतर फलंदाज मात्र झटपट बाद झाले. मात्र संपूर्ण सामना गाजवला तो ख्रिस गेल यानेच. शतकाला अवघ्या चार धावा शिल्लक असताना तो दुदैवीपणे धावबाद झाला आणि गेलची वादळी खेळी संपुष्टात आली. विराटने १३ धावा केल्या. त्याआधी, गंभीरचे शानदार अर्धशतक (५८) आणि आंद्रे रसेलच्या १७ चेंडूंत ४१ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूपुढे २० षटकांत ६ बाद १७७ धावांचे आव्हान उभे केले होते. ईडन गार्डन्सवरील या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय कोलकात्याच्या गौतम गंभीर आणि रॉबिन डिसोझाने चुकीचा ठरवला. त्यांनी पहिल्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली. अवघ्या १० षटकांत त्यांनी या धावा फटकावल्या. रॉबिन ३५ धावांवर सॅमीकरवी झेलबाद झाला. अर्धशतक झळकावून गौतम गंभीर बाद झाला. तेव्हा कोलकात्याने शतकी धावसंख्या गाठली होती. त्यानंतर मनीष पांडे (२३), सूर्यकुमार यादव (११), युसूफ पठाण (३) यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केला. पांडे बाद झाल्यानंतर कोलकात्याची धावगती कमी झाली होती. त्याच वेळी आंद्रे रसेलने विस्फोटक फटकेबाजी केली. त्याने अवघ्या १७ चेंडूंत ४१ धावा फटकावल्या. यात त्याच्या ६ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. बंगळुरूकडून वरुण अॅरोन, हर्षल पटेल, अबू नचिम आणि चहल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलककोलकाता नाईट रायडर्स :- उथप्पा झे. नचिम गो. सॅमी ३५, गंभीर झे. मनदिप गो. चाहल ५८, पांडे धावबाद २३, सुर्यकुमार यादव झे. मनदिप गो. पटेल ११, युसूफ पठाण झे. कोहली गो. अॅरोन ३, आंद्रे रसेल नाबाद ४१, शकीबूल हसन धावबाद ०. २० षटकांत ६ बाद १७७. गोलंदाजी : अॅबोट ३-०-३६-०, पटेल ४-०-३७-१, अॅरोन ४-०-३८-१, नचिम ४-०-२८-१, सॅमी १-०-७-०. चाहल ४-०-२८-१.रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : गेल धावबाद ९६, कोहली झे. उथप्पा गो. मार्केल १३, कार्तिक त्रि. गो. पठाण ६, मनदिप सिंग त्रि. गो. पठाण ६, डिव्हिलियर्स यष्टिचित उथप्पा गो. कॅरियप्पा २८, सॅमी यष्टिचित गो. शकिब अल हसन ७. गोलंदाजी : मार्केल ३५/१, पठाण ४०/२.
आॅल इज ‘गेल’!
By admin | Published: April 12, 2015 1:07 AM