मुंबई : पदुकोन स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित अखिल भारतीय सब-ज्युनियर (१३ वर्षांखालील) रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन येथे ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत होणार आहे. मुले-मुली एकेरी व दुहेरी अशा चार गटांत ही स्पर्धा पार पडेल. स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या खेळाडूला प्रत्येकी ३६ हजार रुपये मिळतील. उपविजेत्याला १८ हजार रुपयांचे बक्षीस मिळेल, याशिवाय उपांत्य फेरीतील पराभूत खेळाडूला १४ हजार आणि उपांत्यपूर्व फेरीतील पराभूत खेळाडूंना १२ हजार रुपये मिळतील. दुहेरीतील विजेत्या जोडीला ३८ हजार रुपयांचे आणि उपविजेत्यांना १९ हजार रुपयांचे बक्षीस मिळेल.
या स्पर्धेत देशभरातून ४४० खेळाडूंच्या जवळपास ५५६ प्रवेशिका आल्या आहेत. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या बॅडमिंटन कोर्टवर प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जात असून मुले आणि मुली एकेरी आणि दुहेरी अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा होईल. या मुले एकेरीत यश सिन्हा, रियान मल्हन तसेच हिताइश्री राजा आणि लक्ष्मी सुप्रिया राव पसुला यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे सीडिंग देण्यात आले आहे. मुले दुहेरीत मोहित दर्शन, महेश कुमार जोडीला अव्वल तसेच आयुष पावसकर आणि यश सिन्हा जोडीला दुसरे, मुली दुहेरीत थनमई दमन आणि लक्ष्मी सुप्रिया यांना अव्वल आणि अलिशा भंडारी, सौम्या भटनागर जोडीला दुसरे सीडिंग देण्यात आले आहे. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने होणार्या राष्ट्रीय स्पर्धेचे नियोजन ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनकडून केले जाणार आहे.