शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

संघातील सर्वच खेळाडू ‘मॅच विनर’

By admin | Published: March 07, 2016 11:26 PM

बांगलादेशवर मात करीत आशिया कप जिंकणारा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आघाडीच्या फळीतील फलंदाजांची प्रशंसा करताना संघातील सर्वच खेळाडू मॅचविनर असल्याचे सांगितले आहे.

मीरपूर : बांगलादेशवर मात करीत आशिया कप जिंकणारा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आघाडीच्या फळीतील फलंदाजांची प्रशंसा करताना संघातील सर्वच खेळाडू मॅचविनर असल्याचे सांगितले आहे.भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा आशिया कप जिंकला. याआधी धोनीच्या नेतृत्वात २0१0 मध्ये आशिया कप जिंकला होता; परंतु तेव्हा ही स्पर्धा ५0 षटकांची होती. ही स्पर्धा प्रथमच ट्वेंटी-२0 झाली आणि भारताने यात बाजी मारली.धोनीने म्हटले, ‘‘संघ सलग जिंकताना पाहणे सुखद आहे. संघाने शानदार कामगिरी करताना या वर्षी ११ ट्वेंटी-२0 पैकी १0 सामने जिंकले आहे. जे की विश्वकपआधी आमच्यासाठी आत्मविश्वास उंचावणारा आहे. संघ सध्या शानदार लयीत आहे आणि मेगा स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा शानदार मिलाफ आहे आणि सर्वच मॅचविनर असल्याचे सिद्ध होत आहे.’’ धोनीने केली विक्रमाची बरोबरीट्वेंटी-२0 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जास्त सामन्यांत कर्णधारपद भूषवण्याचे रेकॉर्ड आपल्या नावावर करणाऱ्या धोनीने या खेळाच्या झटपट फॉरमॅटमध्ये सलग सर्वात जास्त सामने जिंकण्याच्या आपल्या विक्रमाची बरोबरी केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या वर्षी ११ पैकी १0 सामने जिंकले आहेत. धोनी सलग सात सामने जिंकला आहे आणि त्याने ट्वेंटी २0 मध्ये सर्वाधिक सात सामने जिंकण्याच्या आपल्या विक्रमाची बरोबरी केली. धोनीने आशिया कप फायनलमध्ये यजमान बांगलादेशला आठ विकेटने पराभूत करीत आपला सलग सातवा विजय मिळवला आहे.धोनीने त्याचबरोबर सहाव्यांदा आशिया कपवर कब्जा मिळवला आहे आणि श्रीलंकेला मागे टाकले आहे. श्रीलंकेने पाच वेळेस या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. धोनी आता एकमेव असा कर्णधार बनला आहे की ज्याने आशिया कप ५0-५0 आणि ट्वेंटी -२0 फॉरमॅटमध्ये विजेतेपद पटकावले आहे. भारताने आशिया कपमध्ये विजेतेपद पटकावताना सलग पाच सामने जिंकले. (वृत्तसंस्था)त्याआधी त्यांनी श्रीलंकेविरुद्ध घरच्या मालिकेत २-१ च्या विजयात सलग दोन सामने जिंकले होते. ट्वेंटी-२0 मध्ये सलग आठ सामने जिंकण्याचा विक्रम संयुक्त रूपाने इंग्लंड आणि आयर्लंड या संघाच्या नावावर असून धोनीला ट्वेंटी-२0 वर्ल्डकपमध्ये हा विक्रम मोडण्याची संधी असेल.()मोहम्मद शमी जर टी-२0 वर्ल्डकपसाठी फिट झाला तरीही महेंद्रसिंह धोनीच्या नुसार जसप्रीत बुमराह आणि आशिष नेहरा यांचे स्थान घेणे कठीण आहे. कारण संघ जास्त समतोल आहे. धोनी म्हणाला, शमी तंदुरुस्त आहे अथवा नाही हे आम्हाला माहीत नाही. अजून त्याच्याजवळ वेळ आहे. त्यामुळे त्याला निवडण्यात आले होते. कारण त्याच्यात क्षमता आहे. तो नवीन आणि जुन्या चेंडूने यॉर्कर टाकू शकतो; परंतु बुमराहची जागा घेणे त्याच्यासाठी कठीण आहे. कारण त्याने चांगली कामगिरी केली. हार्दिक पांड्या वेगवान गोलंदाज व अष्टपैलू आहे. शमी फक्त आशिष नेहराची जागा घेऊ शकतो. कारण हे खूप कठीण आहे. आशिषने चांगली कामगिरी केली आहे.टीका करणे सोपेमहेंद्रसिंह धोनीने त्याच्यावर टीका करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेताना क्रिकेटमध्ये भारतातील लोक व्यक्तिस्वातंत्र्याचा उपयोग करीत असल्याचे म्हटले. बांगलादेशवर आठ गडी राखून आशिया कप जिंकल्यानंतर तो म्हणाला, भारतातील प्रत्येक प्रकरणावर व विशेषत: क्रिकेटवर एक मत असते. वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. असे खेळा, तसे खेळा, हे करा, ते करा. विशेष म्हणजे क्रिकेट टीव्हीवर पाहताना सोपे दिसते; परंतु मैदानावर तसे नसते. टीका तर होणारच.