राजकोट : भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकण्याआधीच क्रि केटर रवींद्र जडेजा सेलिब्रेशनच्या तयारीत आहे. रवींद्र जडेजाच्या आनंदाचे कारण असे की तो ‘बाबा’ झाला आहे. त्याला गुरुवारी मुलगी झाली. अष्टपैलू जडेजा सध्या इंग्लंडमध्ये आहे. मात्र इकडे भारतात त्याची पत्नी रविनाने एका गोड कन्येला जन्म दिला. रविना आणि रवींद्र जडेजा यांचे लग्न गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात झाले. ‘मला माझ्या गरोदर बायकोला सोडून आयसीसी ट्रॉफीसाठी जावे लागते आहे पण मला माझ्या कुटुंबापेक्षा देशासाठी खेळणे महत्त्वाचे वाटते,’ असे जडेजाने स्टार स्पोर्टस्ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. माझे कुटुंब माझ्यासाठी महत्त्वाचे आहे मात्र चांगला खेळ करून मला देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे. माझ्या पत्नीची काळजी घेण्यासाठी कुटुंबातले इतर सदस्य तिच्याजवळ आहेत असेही जडेजाने म्हटले होते. रविनाला वर्षाच्या सुरुवातीलाच एक छोटासा अपघात झाला होता. मात्र त्यातून ती बचावली. तसेच बाळाला कोणतीही इजा झाल्याचे वृत्त नव्हते. (वृत्तसंस्था)
अष्टपैलू रवींद्र जडेजाला कन्यारत्न
By admin | Published: June 09, 2017 4:00 AM