पुणे : पुण्यामध्ये होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची सर्व तिकीटे संपली आहे. हा सामना गहुंजेतील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर १५ जानेवारीला रंगणार आहे.दिवस-रात्र होणाऱ्या या सामन्याची तिकीटे संपल्याचे एमसीएकडून सांगण्यात आले. १५ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष आणि आॅनलाईन तिकीट विक्रीस सुरूवात करण्यात आली होती. या स्टेडियमची आसनक्षमता ३७ हजार ४०६ इतकी आहे. केवळ १२ दिवसांमध्ये ही सर्व तिकीटे विकल्या गेली. इंग्लंडला भारत दौऱ्यात तीन एकदिवसीय व तीन टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना १९ जानेवारीला कटक येथे होणार असून तिसरा सामना २२ जानेवारीला कोलकाता येथे खेळविण्यात येईल. यानंतर, २६ जानेवारीपासून टी२० सामन्यांची मालिका होणार असून हे सामने अनुक्रमे कानपूृअ, नागपूर आणि बंगळुरु येथे खेळविण्यात येतील. (क्रीडा प्रतिनिधी)पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादभारतीय संघ सध्या मायदेशात खेळताना यशाचे नवे पर्व लिहीत आहे. मोठ्या कालावधीनंतर पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय सामना होतोय. क्रीडाप्रेमी पुणेकरांचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे तिकीटे लवकर संपली.- अजय शिर्के, अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट संघटनातीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामनापुण्यामध्ये ३ वर्षांनंतर भारत विरूध्द इंग्लंड लढतीच्या रूपात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. याआधी १३ आॅक्टोबर २०१३मध्ये भारत विरूध्द आॅस्ट्रेलिया एकदिवसीय सामना झाला होता.
भारत-इंग्लंड लढतीची सर्व तिकिटे संपली
By admin | Published: December 29, 2016 12:54 AM