भारताच्या अमित खत्रीनं २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या १०,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. हिमा दास आणि नीरज चोप्रा यांच्या पावलावर पाऊल ठेवत अमितनं हे ऐतिहासिक पदक जिंकले. हिमानं २०१८मध्ये याच स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते, तर भालाफेकपटू नीरज चोप्रानं २०१६साली ८६.४८ मीटर लांब भालाफेक करताना वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला अन् ऐतिहासिक सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर आज ट्रॅक अँड फिल्डमध्ये अमितनं हा पराक्रम केला. ( India's Amit Khatri scripted history at the World Athletics U20 Championships, winning a silver medal at the Men's 10,000m Race Walk event)
Video : 'तू ने मारी एन्ट्री, और...'; बॉलिवूड गाण्यावर पी व्ही सिंधूनं धरला ठेका अन् चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका!
या क्रीडा प्रकारातील या स्पर्धेत मिळालेलं हे पहिलेच पदक आहे. केनियाच्या हेरिस्टन वानीओनीनं सुवर्णपदक जिंकले. अमितनं ४२ मिनिटे १७.४९ सेकंदाची वेळ नोंदवून हा पराक्रम केला. सुवर्णपदकापासून तो ७.१० सेकंदानं हुकला. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे पदक आहे. याआधी भारताच्या ४ बाय ४०० मीटर मिश्री रिले संघानं कांस्यपदक जिंकले आहे. एकूण २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेतील हे भारताचे सहावे पदक ठरले.