शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

अनिदिंत रेड्डीचा दुहेरी विजय

By admin | Published: October 09, 2016 4:41 AM

हैदराबादचा अनिदिंत रेड्डी कोंडा याने राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी झालेल्या तिसऱ्या फेरीतील युरो जेके १६च्या दोन्ही शर्यती जिंकून या गटातील अजिंक्यपदाची

- विश्वास चरणकर, कोइमतूरहैदराबादचा अनिदिंत रेड्डी कोंडा याने राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी झालेल्या तिसऱ्या फेरीतील युरो जेके १६च्या दोन्ही शर्यती जिंकून या गटातील अजिंक्यपदाची स्पर्धा आणखीनच चुरशीची बनविली. तर, एजीबी फॉर्म्युला ४ प्रकारात विष्णू प्रसादने आपली आघाडी कायम ठेवली.जेके १६ची तिसरी फेरी सुरूहोण्यापूर्वी अनिदिंत ३८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर होता. मात्र, त्याने शनिवारी दोन्ही स्पर्धा जिंकल्यामुळे त्याचे ५८ गुण झाले आहेत. त्याने आघाडीवर असलेल्या नयन चटर्जीबरोबरची आघाडी कमी केली आहे. एलजीबी फॉर्म्युला ४ मध्ये मेको रेसिंगच्या विष्णू प्रसादने आपला दबदबा कायम ठेवला. त्याने १९ मिनिटे ५८.२७३ सेंकदांत ही शर्यत जिंकली. मागील ४ शर्यतींतील विष्णूचा हा तिसरा विजय आहे. त्याचे आता एकूण ४६ गुण झाले आहेत. त्याला दुसऱ्या क्रमांकावरील रंगासामीने चांगलीच लढत दिली. रंगासामीने १९ मिनिटे ५८.३०३ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. त्याचे आता ३७ गुण झाले आहेत. या स्पर्धेत डार्क डॉन रेसिंगचा रोहित खन्ना याने तिसरा क्रमांक मिळविला.जेके टुरिंग कप स्पर्धेत बंगळुरूच्या आशिष रामास्वामीने १४ मिनिटे १६.६०८ सेंकदांत ही स्पर्धा पूर्ण केली. याबरोबर त्याचे १०० गुण झाले आहेत. ग्रेटर नोएडा येथील बुद्ध सर्किटवर होणाऱ्या अंतिम फेरीपूर्वीच त्याने आपले विजेतेपद पक्के केले आहे. रामास्वामीचा हा सलग पाचवा विजय आहे. या शर्यतीत बंगळुरूचा दीपक पाल चिनप्पा दुसऱ्या, तर कोइमतूरचा विजयकुमार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या गटात रामास्वामीला आव्हान देणारा राजाराम सी. सातव्या क्रमांकावर फेकला गेला. राजारामचे फक्त ५१ गुण झाले आहेत. अनिदिंतने पहिली शर्यत १५ मिनिटे ४७.३१९ सेकंदांत, तर दुसरी शर्यत १७ मिनिटे २०.५१ सेकंदांत पूर्ण केली. - कर्नाटकाचा अनंत षण्मुगम् दुसऱ्या, तर महाराष्ट्राचा मोहंमद नळवाला तिसऱ्या क्रमांकावर राहिला. - अनंतचे ६४ गुण झाले असून, तो नयन (६८ गुण)पेक्षा फक्त चारच गुणांनी मागे आहे. - शनिवारच्या दोन्ही स्पर्धांत नयन चौथ्या क्रमांकावर राहिला.