शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आणि हा संघ झाला 28 धावांत गारद

By admin | Published: April 23, 2017 2:10 PM

एकदिवसीय सामन्यात अकरा खेळाडू असतात. या अकरा खेळाडूंनी मिळून बनवल्या फक्त 28 धावा, त्यातही 13 धावा अवांतर होत्या.

ऑनलाइन लोकमतथायलंड, दि. 23 - एकदिवसीय सामन्यात अकरा खेळाडू असतात. या अकरा खेळाडूंनी मिळून बनवल्या फक्त 28 धावा, त्यातही 13 धावा अवांतर होत्या. संघातील अकरा खेळाडूंना 100 धावाही बनवता न येणं म्हणजे हास्यपदच आहे. हे वाचून तुम्हालाही कदाचित विश्वास बसणार नाही. पण हा पराक्रम केला आहे चीनच्या संघाने. होय, आयसीसी वर्ल्ड लीगच्या पात्रता फेरीतील एका सामन्यात सौदी संघाविरोधात खेळणाऱ्या चीन संघाचा अक्षरशः धुव्वा उडाला. चीनचा अख्खा संघ अवघ्या 28 धावांत आटोपला. 50 षटकांच्या या सामन्यात चीनला सौदीविरोधात तब्बल 390 धावांनी पराभूत व्हावं लागले. सध्या थायलंडमध्ये आयसीसी वर्ल्ड लीग सुरू आहे. या स्पर्धेत यजमान थायलंडसह भूतान, बहारिन, कुवैत, कतार यांच्यासह सौदी आणि चीनच्या संघांनी सहभाग घेतला आहे. थायलंड येथील चियांग माईतील जिमखाना क्लबमध्ये चीन आणि सौदी या दोन संघांत पात्रता फेरीतील सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना सौदीच्या संघाने 50 षटकांत 418 धावांचा डोंगर उभा केला. हे आव्हान घेऊन चीनचा संघ मैदानावर उतरला. मात्र, चीनच्या अख्ख्या संघाने 12.4 षटकांत अवघ्या 28 धावा करत लाजिरवाणा पराभव स्वीकारला. चीनच्या संघातील 7 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. इतर तीन फलंदाजांनी अनुक्रमे 3, 3 आणि नाबाद 6 धावा केल्या.

याआधी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2004 मध्ये श्रीलंकेच्या संघाने झिम्बॉम्बेच्या संघाचा 35 धावांमध्ये खुर्दा उडवला होता.