1मुख्य स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून धक्कादायक विजयाची मालिका गुंफणाऱ्या बिगरमानांकित तामिळनाडूच्या वसावी गणेशनचा धडाका अखेर अंतिम सामन्यात थांबला. आंध्र प्रदेशच्या चौथ्या मानांकित अक्षरा इस्काने दर्जेदार खेळाच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवल्याने वसावीला नुकत्याच पार पडलेल्या आॅल इंडिया महिला टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 2 खार जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वांचे लक्ष वसावीच्या खेळावर लागले होते. त्याचवेळी पूर्णपणे फॉर्ममध्ये असलेल्या अक्षराने धोकादायक वसावीचे कोणतेही दडपण न घेता सहज बाजी मारली. 3पहिल्या सेटपासून आक्रमक पवित्रा घेणाऱ्या अक्षराने संपूर्ण सामन्यात वसावीला डोके वर काढण्याची एकही संधी न देता ६-२, ६-२ असा धमाकेदार विजय मिळवला. ९० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात वेगवान खेळ करताना अक्षराने बॅकहँड शॉट्सवर प्रामुख्याने भर दिला. त्याचवेळी अक्षराच्या आक्रमक खेळापुढे सामन्यावरील नियंत्रण गमावलेल्या वसावीला अखेरपर्यंत पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही. (क्रीडा प्रतिनिधी)
आंध्रच्या अक्षराचे धमाकेदार जेतेपद
By admin | Published: February 03, 2015 1:57 AM