शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

युकीसमोर आता अँडी मरेचे ‘चॅलेंज’

By admin | Published: January 17, 2015 11:58 PM

माजी ज्युनिअर आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन भारताच्या युकी भांबरीने आॅस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीचे आव्हान यशस्वीरीत्या पार करताना मुख्य फेरीत मजल मारली आहे़

मेलबोर्न : माजी ज्युनिअर आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन भारताच्या युकी भांबरीने आॅस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीचे आव्हान यशस्वीरीत्या पार करताना मुख्य फेरीत मजल मारली आहे़ मुख्य फेरीच्या लढतीत या भारतीय खेळाडूला ब्रिटनचा स्टार टेनिसपटू अँडी मरेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे़ जागतिक क्रमवारीत ३१४व्या स्थानावर असलेल्या युकीने स्पर्धेच्या पात्रता फेरीतील तिसऱ्या सामन्यात आक्रमक खेळ करताना १७९व्या क्रमांकावर असणाऱ्या अमेरिकेच्या चेस बुकाननला ६-३, ६-४ ने धूळ चारताना थाटात आॅस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला़ युकीने जबरदस्त खेळ करताना पहिला सेट २६ मिनिटांत आणि दुसरा सेट ४९ मिनिटांत आपल्या नावे करण्यात यश मिळविले़ भारतीय खेळाडूने पाचपैकी तीन ब्रेक गुणांची कमाई केली़ त्याने या सामन्यात १९ विनर्स आणि ५ एस लगावले़ बुकाननला २ पैकी एकाच ब्रेक गुणाची कमाई करता आली़ त्याने तब्बल २१ टाळता येणाऱ्या चुका केल्या़ त्यामुळेच त्याला पराभवाचा सामना करावा लागला़ २२ वर्षीय युकीला कारकिर्दीतील सर्वात मोठ्या मुकाबल्यात माजी विम्बल्डन चॅम्पियन आणि सहावे मानांकन प्राप्त अँडी मरेचा सामना करावा लागणार आहे़ भारताचा डेव्हिस चषक खेळाडू असलेल्या युकी २००९मध्ये येथे ज्युनिअर चॅम्पियन राहिला आहे़ स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताच्या सोमदेव देववर्मन आणि रामकुमार रामनाथन यांनी आपले नशीब आजमावले होते; मात्र त्यांना पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला़ (वृत्तसंस्था)मरेला उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षाच्आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत कठीण ड्रॉ मिळाला आहे़ तरीही या स्पर्धेत आपण सर्वोत्कृष्ट कामगिरी करू’, असे मत इंग्लंडचा अनुभवी खेळाडू अँडी मरे याने व्यक्त केले आहे़च्मरेला फायनलपर्यंतच्या प्रवासात त्याला स्वीत्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर आणि स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल यांच्याशी सामना करावा लागू शकतो़