ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, २३ - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे याची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा निर्णय जाहीर केला. एका वर्षासाठी ही निवड करण्यात आली असून कुंबळे यांच्या सहाय्यासाठी असणारी सहकाऱ्यांची निवडही लवकरच जाहीर करण्यात येईल असे ठाकूर म्हणाले.
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्या निवड समितीने आज भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याची निवड केली.
अनिल कुंबळे यांची कारकिर्द
- लेगस्पिनर असलेल्या कुंबळेने 132 कसोटी सामन्यांमध्ये 619 बळी घेतले असून मुथय्या मुरलीधरन व शेन वॉर्न यांच्या खालोखाल ही कामगिरी आहे.
- तर एकदिवसीय सामन्यांमध्ये कुंबळेने 171 सामन्यांमध्ये 337 गडी बाद केले आहेत.
- 1999मध्ये एका डावात 10 विकेट घेण्याचा पराक्रम कुंबळेच्या नावावर आहे.
The BCCI announces the appointment of Mr. Anil Kumble as Head Coach of the Indian Cricket Team for one year. pic.twitter.com/yZNohzFfwc— BCCI (@BCCI) June 23, 2016