नवी दिल्ली - भारताची नेमबाज अंजूम मुदगिल हिने मेक्सिकोत सुरू असलेल्या आयएएसएफ विश्वचषक नेमबाजीच्या महिला रायफल थ्रो पोजिशनच्या पाच मीटर प्रकारात रौप्यपदक जिंकले. विश्वचषकात अंजूमचे हे पहिलेच पदक आहे.वेगवान वाºयांचा अडथळा असताना अंजूमने ४५ शॉटच्या अंतिम फेरीत ४५२.२ गुणांची कमाई केली. चीनची माजी ज्युनियर विश्व चॅम्पियन रुईजाओ पेई हिने ४५५.४ गुणांसह दुसरे आणि टीम सून हिने ४४२.२ गुणांसह कांस्यपदक जिंकले. भारताचे स्पर्धेतील हे आठवे पदक आहे. तीन सुवर्ण, चार कांस्यपाठोपाठ हे पहिलेच रौप्य मिळाले. भारतीय खेळाडूंची आयएएसएफ विश्वचषकातील आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. भारत आठ पदकांसह अव्वल स्थानावर असून चीन दुसºया स्थानावर आहे.अंजूम ही अंतिम फेरीत सुरुवातीपासून पदकाच्या चढाओढीत कायम होती. १५ शॉटच्या पोजिशनमध्ये ती तिसºया स्थानावर राहिली. पाच शॉटच्या पोजिशनमध्ये तिने आघाडी घेतली. जर्मनीची अव्वल नेमबाज झोलिन बियर हिला अंजूमने मागे टाकले. त्याआधी, पात्रता फेरीत अंजूमने प्रोन प्रकारात ४०० पैकी ३९९ गुणांची कमाई करताच ती दुसºया स्थानावर आली.शिवाय आठ महिलांच्या अंतिम फेरीतही दाखल झाली. गायत्री ही देखील फायनलच्या चढाओढीत होती पण ११५३ गुणांसह ती १५ व्या स्थानावर घसरली. माजी प्रोन विश्वचॅम्पियन तेजस्विनी सावंत हिने देखील इतकेच गुण संपादन केले पण ती गायत्रीच्या तुलनेत माघारली.पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात १५ वर्षांचा अनिश भानवाला याला आघाडीच्या सहा खेळाडूंमध्ये दाखल होण्याची संधी होती पण तो सातव्या स्थानावर घसरला. नीरज कुमार तब्बल ३१ व्या स्थानावर घसरला.(वृत्तसंस्था)
अंजूमला रायफल थ्रीचे रौप्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:56 AM